शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या आरोपीचा शोध सुरु

By admin | Updated: December 31, 2015 13:36 IST

पाथरी -सेलू रस्त्यावर तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले

 पाथरी : पाथरी -सेलू रस्त्यावर तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घातला होता. या घटनेत अवघ्या काही तासांत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आता चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे. पाथरी- सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारातील तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारच्या रात्री धुमाकूळ घातला होता. शस्त्रांनी वार केल्याने यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून एका गर्भवती महिलेवरही अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी गांभिर्य ओळखत या प्रकरणात सुनील शेषराव शिंदे, अनिल उत्तम पवार आणि रवि भास्कर पवार या तिघांना अटक केली होती. आणखी एक संशयितही ताब्यात घेतला होता. बुधवारी दिवसभर पोलिसांनी कसून तपास केला. परंतु, संशयिताकडून काही हाती लागले नाही. पकडलेल्या इतर तीन आरोपींकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिस आता चौथ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेत जखमी झालेले अशोक पितळे, दामोधर पितळे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. 

पीडितास न्याय मिळवून देणार -फौजिया खान

दरम्यान, ३0 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी घटनास्थळाला भेट दिली. खेडूळा बलात्कार व दरोडा प्रकरण गंभीर असून पीडितांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खेडूळा पाटी येथील दोन्ही आखाड्यावर भेट देऊन हम्मू चाऊस यांच्या शेतातील घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. यावेळी परिवर्तन विकासमंचचे सईद खान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव सोनाली देशमुख आदींची उपस्थिती होती. डॉ.खान यांनी पाथरी पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक नृसिंह ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा केली. 

या प्रकरणातील राहुल पवार याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव असल्याचे समजताच डॉ.फौजिया खान यांनी तहसीलदारांशी चर्चा केली. राहुल पवार याची फाईल फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असल्याचे समजल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्याशी संपर्क साधून लक्ष घालण्यास सांगितले. 
/(प्रतिनिधी)