शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरी करणारे चार कारखाने सील

By admin | Updated: April 16, 2016 01:36 IST

नांदेड :एकीकडे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळामुळे नागरीक घागरभर पाण्यासाठी घायकुतीला येत असताना, मनपाच्या पाण्यावर डल्ला मारुन लाखो रुपयांची

नांदेड :एकीकडे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळामुळे नागरीक घागरभर पाण्यासाठी घायकुतीला येत असताना, मनपाच्या पाण्यावर डल्ला मारुन लाखो रुपयांची माया जमविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात शुक्रवारी उघडकीस आला़ याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांनी अशा चार पाणी शुद्धीकरण कारखान्यांना सील ठोकले आहे़ त्यामुळे शुद्ध पाण्याचा अशुद्ध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात आता जेमतेमच साठा शिल्लक आहे़ इसापूर धरणाचे पाणी मिळाल्यामुळे पर्यायी उद्भव योजनेतून काही प्रमाणात का होईना नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे़ परंतु असे असतानाही नांदेडला सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर शहरातील अनेक भागाची तहान ही टँकरवरच भागविली जात आहे़ त्यामुळे सर्वांचे पाणी बचतीवर लक्ष केंद्रीत झाले आहे़ अशा परिस्थितीत नांदेडात मात्र पाण्याचा धंदा तेजीत आहे़ एक लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी जवळपास दीड लिटर पाणी वाया जाते़ असे असताना, नांदेडात मात्र पाणी विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे़ यापैकी अनेक पाणी विक्रेत्यांनी मनपाची कुठलीच परवानगी घेतली नसून मुळ प्रश्न यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ त्यात आनंदनगर भागातील एका वॉटर प्लान्ट चालकाने मनपाच्या मुख्य जलवाहिनीला चोरट्या मार्गाने जोडणी देवून तेच पाणी वॉटर प्लान्टला वापरत असल्याची माहिती आयुक्त सुशील खोडवेकर यांना मिळाली़ त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास आयुक्त खोडवेकर यांनी फौजफाट्यासह या प्लान्टवर धाड मारली़ कारखाने चालविणाऱ्याकडे मनपाची परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले़ तसेच मनपाचे पाणी फिल्टर न करताच थेट जारमध्ये भरण्यात येत असल्याचेही उघडकीस आले़ त्यावर आयुक्तांनी हा वॉटर प्लान्ट त्वरित सील केला़ तसेच रस्त्यावरुन पाण्याचे जार घेवून जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत त्यांनी मनपाचे कर्मचारी पाठवून त्या प्लान्टची चौकशी करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार शहरातील चार प्लान्टला शुक्रवारी सील ठोकण्यात आले़ या वॉटर प्लान्ट चालकांनी मनपाची कोणतीच परवानगी काढली नव्हती़