शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परंड्याच्या किल्ल्याचे रूपडे बदलणार

By admin | Updated: October 15, 2016 01:00 IST

परंडा : राज्यातील सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याचे आता लवकरच रूपडे बदलणार आहे.

परंडा : राज्यातील सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याचे आता लवकरच रूपडे बदलणार आहे. किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील एक कोटीच्या निधीची तरतूद चालू वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा भुईकोट किल्ला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करीत आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी मलब्याचे ढिग पडले आहे, तर झाडे-झुडुपे वाढल्याने किल्ल्याचे अभेद्य बुरूजही संकटात सापडले आहे. विशेष म्हणजे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठीही सोयी-सुविधा नसल्याने याबाबत पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आ. सुजितसिंह ठाकूर यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार कोटी ७२ लाख ७१ रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर आता मंजूर निधीपैकी २०१५-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निधीतून किल्ल्यातील मलबा काढणे, झाडे-झुडुपे काढणे, विहिरीतील गाळ काढणे, खंदकाच्या पडलेल्या भिंतीचे बांधकाम करणे, तसेच आतील पुरातन तहसील इमारत, महाफिजखाना, अंतर्गत दरवाजांची दुरुस्ती, भिंतींची रंगरंगोटी यांसह पर्यटकांकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यटकांना बसण्याकरिता दगडी बेंचेस आदी कामे करण्यात येणार आहेत.