शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून खेचाखेची

By admin | Updated: September 28, 2014 01:04 IST

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार ठरविताना भाजपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड खेचाखेची झाली.

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार ठरविताना भाजपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड खेचाखेची झाली. समझोत्याचे सर्वच उपाय खुंटल्यामुळे नेत्यांनी शक्कल लढवून इच्छुक संजय केणेकर व अतुल सावे यांना थेट निवडणूक कार्यालयात पाठवून दिले. उमेदवारी दाखल करण्यास शेवटचा अर्धा तास उरला असताना एबी फॉर्म एकाच्या हाती सोपवला आणि दुसऱ्याला तेथील पोलीस बंदोबस्तामुळे राग व्यक्त करता येणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वमधून कुणाला उमेदवारी द्यावी, याचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली होती. संजय केणेकर व अतुल सावे हे दोघेही तेथे उपस्थित होते. दानवे यांनी दोघांमध्ये समेट घडवून एकाने माघार घ्यावी, यासाठी तीन तास घालविले; परंतु दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे निर्णय न घेताच दानवे यांच्या निवासस्थानावरील बैठक संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानवे यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्मही होता; परंतु दोघांमध्ये एकमत होत नसल्यामुळे त्यांनी तो तेथे देण्याचे टाळले; अन्यथा त्यांच्या निवासस्थानीच इच्छुकांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता होती. हा अनर्थ टाळण्यासाठी कोणताही निर्णय न होताच तेथील बैठक आटोपती घेण्यात आली व दोघांनाही निवडणूक कार्यालयात पाठवून देण्यातआले. केणेकर व सावे एकापाठोपाठ निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर काही वेळाने प्रदेश सरचिटणीस ठाकूर हे एबी फॉर्म घेऊन आले. तोपर्यंत निवडणूक कार्यालयात संजय केणेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले होते. ठाकूर व केणेकर यांच्यातील संवाद बिघडताच हे कार्यकर्ते बिथरले होते; परंतु पोलिसांनी सर्वांना परिसरातून बाहेर काढले. नेत्यांचा तणावाचा अर्धा तास पोलिसांच्या उपस्थितीत सुरक्षित गेला. या काळात केणेकर यांचे वरिष्ठांशी बोलणेही करून देण्यात आले व प्रकरण निस्तरले. सेनेत जाण्याचीही तयारी...ही घडामोड सुरू असताना दुसऱ्या बाजूला अतुल सावे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यास त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने सावे यांचा एबी फॉर्म तयार केला होता. त्याचमुळे कला ओझा यांची उमेदवारी दाखल करण्यास विलंब केला जात होता; परंतु सावे यांचे कार्यकर्ते भाजपाकडे जमल्याचे समजताच ओझा यांची उमेदवारी दाखल करून घेण्यात आली.