शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित वेतन श्रेणीसाठी वन कर्मचारी संपावर

By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST

बीड : वन विभागात कार्यरत असलेला वनपाल व वन मजुरांच्या पाल्यांना नोकरीत १० टक्के आरक्षण द्यावे, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी बुधवारपासून बीड जिल्ह्यातील वन कर्मचारी संपावर गेले आहेत.

बीड : वन विभागात कार्यरत असलेला वनपाल व वन मजुरांच्या पाल्यांना नोकरीत १० टक्के आरक्षण द्यावे, सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी बुधवारपासून बीड जिल्ह्यातील वन कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे वन रक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील वनसंपदा सांभाळण्यासाठी ४० वनपाल व ५४० वन मजूर आहेत. सतत दक्ष राहणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळोवेळी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करुनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राज्य वनपाल वनरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.एस. फुंदे यांनी सांगितले. सुधारित वेतनश्रेणी लागू झाली तर कर्मचाऱ्यांचा आर्थिक फायदा होईल याशिवाय वन कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण देणे शक्य होईल. यासाठी राज्यभरातील वन कर्मचारी वेगवेगळ्या स्तरावर लढा देत आहेत. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी संप केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला आहे.वन कर्मचारी संपावर गेले असल्याने जिल्ह्यातील वन संपदा धोक्यात आली असून, प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शतकोटी योजनेला फटकाशासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शतकोटी वृक्ष लागवड करण्यामध्ये वन कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. मात्र आता कर्मचारी संपावर गेले असल्याने शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ६० टक्के वृक्ष लागवड झालेल्या वृक्षांची देखभाल कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत द्यावीवन रक्षण करताना वन कर्मचाऱ्यांना अनेकवेळा धोका होतो. यामध्ये त्यांना अनेकवेळा जीवही गमवावा लागतो. याप्रकारे कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत होणे अपेक्षित आहे. मात्र शासन या निर्णयाबाबत शासन प्रचंड उदासिन असल्याचे पहावयास मिळते. प्रलंबित मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)यापूर्वी अनेकवेळा निवेदन देऊनही आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संप मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.एस. फुंदे यांनी घेतली४वन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वन संपदा धोक्यात आली आहे व प्राण्यांची शिकार होण्याचीही शक्यता