शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाची टोळी सक्रिय

By admin | Updated: May 10, 2014 19:09 IST

वन विभागाचे बोगस नियुक्तीपत्र

वन विभागाचे बोगस नियुक्तीपत्र सावधान : आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रियअशोक कारकेऔरंगाबाद : भारतीय वन विभागात क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्याचे पत्र शहरातील १० ते १२ तरुणांना नवी दिल्ली येथून आले आहे़ प्रशिक्षणादरम्यान सुरक्षा रक्कम म्हणून बँक खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करा, असे सांगून नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे़विशेष म्हणजे भारतीय वन विभागाच्या नावाने कोणताही अर्ज न भरलेल्या तरुणांना असे बनावट नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. तरुणांना गंडविण्यासाठी उमेदवाराची निवड फक्त फोनद्वारे केली जाईल, अशी सूचना पत्रात देण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी पदावर नियुक्ती केल्यानंतर २५ हजार ५०० रुपये महिना पगार, राहण्यासाठी घर, चारचाकी वाहन व त्यावर चालक, ५ लाखाचा भारत सरकारद्वारा विमा, वर्षाला १० टक्के वेतनवाढ, वन मंत्रालयाकडून व्हीआयपी नंबर, महिन्यात तीन वेळा विमान प्रवासाची संधी, असे आमिष दाखविण्यात आले आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आशिषकुमार या नावाने असणार्‍या ३३७२५५०४८६३ या क्रमांकाच्या खात्यावर १३ हजार ३०० रुपये जमा करण्यास सांगितले आहे. यानंतर विभागाचा अधिकारी येऊन उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करून दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी प्रवेशपत्र व व्ही़ आय़ पी़ बॅच नंबर देईल़ उमेदवाराने पैसे भरल्यानंतर दोन दिवस प्रतीक्षा करावी, असे सुचविले आहे़ या नियुक्तीपत्रामुळे तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नियुक्तीपत्र कुणी पाठविले याचा ठावठिकाणा लागत नाही. ना परीक्षा ना मुलाखत उमेदवाराची कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात आलेली नाही़ यापैकी काहींनी वन विभागाचा कोणताही अर्ज भरलेला नाही़, तरीही या तरुणांना नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. युवराज दादाराव पदार या तरुणाला ५ मे रोजी पत्र मिळाले आहे़ त्याने वन विभागाला संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने लोेकमत प्रतिनिधीशी संपर्क साधला़