चैत्राच्या उन्हात बहरली फुलांची बाग

By Admin | Updated: April 8, 2016 00:04 IST2016-04-07T23:57:23+5:302016-04-08T00:04:14+5:30

नांदेड : सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहून टाकतो़ काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते़

The flower garden of the Chaitra era | चैत्राच्या उन्हात बहरली फुलांची बाग

चैत्राच्या उन्हात बहरली फुलांची बाग

नांदेड : सुंदर फुलांचा टवटवीतपणा मनाला मोहून टाकतो़ काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते़ अशी नानाविध जातीची फुले चैत्र व वैशाखात बहरतात़ हिरव्यागार पानातून डोकावणारे फुले स्वत:च्या वेगळेपणाची साक्ष देत असतात, याची अनुभूती नांदेडकरांना मिळत आहे़
चैत्राच्या उन्हाने होरपळणाऱ्या जिवांना एखाद्या हिरव्यागर्द झाडाचे दर्शन होणे, त्यातच हिरव्या पानांतून लालचुटूक फुलांचे डोकावणे मनाला आनंदी करते़ सृष्टीवर इतर झाडांची पानगळ होत असतानाच काही झाडे मात्र आपले अस्तित्व सांभाळून असतात़
या झाडांची पाने, फुले याच दिवसात बहराला येतात़ कुठे एखाद्या उजाड डोंगरमाथ्यावर हरवलेले एखादे रानफूल नजर वेधून घेते़ या उन्हाच्या काहिलीत हे इवलेसे फूल कसे बरे टवटवीत आहे? असा विचार मनाला पडतो़ निसर्गाची ही किमया उन्हाळ्यात अनेक फुलांच्या बाबतीत पहावयास मिळते़ जंगलातील हजारो पर्णहीन वृक्षांच्या सोबत राहून गुलमोहर आपल्या वैभवाची साक्ष देत रंगांची उधळण करतो़
सध्या संक्रातवेल, मोगरा, चाफा, एडिनीयम, सीताअशोक, कांचन, टबेबिया रोजीया, अमलताश, पळस, कदंब आदी फुलांचे झाडे फुलत असल्याचे महेश शुक्ला यांनी सांगितले़ नांदेड शहरात सध्या मुख्य रस्त्यावर अनेक झाडांची सावली सोबतीला आहे़ तसेच विविध फुलांची झाडेही बहरली आहेत़
विशेषत: गुलमोहराच्या फुलांचे आकर्षण वाटत आहे. लाल, पिवळ्या, गुलाबी रंगांची ही फुले उन्हाशी मैत्री करताना दिसत आहेत़ ग्रीनसिटी प्रकल्पातंर्गत शहर हिरवेगार होत आहे़ विविध फुलांच्या झाडांनी ते नटले आहे़ (प्रतिनिधी)
बारावा
बारावा या झाडाला चमकदार पिवळ्या रंगाची सुंदर फुले बहरतात़ चैत्र महिन्यामध्ये या झाडाला बहार येतो़ उष्ण व दमट वातावरणात बारावा झाडाची चांगली वाढ होते़ बारावा फुललेली झाडे शहराच्या विविध भागात आढळून येतात. तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड-लोहा-कंधार, नांदेड-हदगाव व किनवट परिसरात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
सध्या उन्हाळा असल्याने ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत़

Web Title: The flower garden of the Chaitra era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.