शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे सात तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:15 IST

सोमवारी जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका परभणी आणि सेलू तालुक्याला बसला आहे. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका परभणी आणि सेलू तालुक्याला बसला आहे. परभणी तालुक्यातील तीन गावातील शेतात दुधना नदीचे पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले. तर सेलू तालुक्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्याने सेलू- पाथरी या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प झाली होती.जिल्हाभरात दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे दुधना, पूर्णा, गोदावरी या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. तर कसुरा नदीला पूर आला. या पुरामुळे सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील दळण-वळणावर परिणाम झाला. सेलू- पाथरी या मार्गाबरोबरच वालूर आणि शिंदे टाकळी मार्गावरील पुलाच्या वरुन पाणी वाहत असल्याने दिवसभर वाहतूक ठप्प होती. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कसुरा नदीला पूर आला. वाहतूक ठप्प झाल्याने सेलू- पाथरी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी ३ वाजता पाणी ओसरले. त्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. देऊळगाव- आष्टी या मार्गावर देऊळगाव जवळ ओढ्याला पूर आल्याने डासाळा-आष्टी मार्ग उशिरापर्यंत बंद होता. रवळगाव- शिंदे टाकळी मार्गावर बोरगाव जवळील ओढ्याला पूर आल्याने आहेर बोरगाव, सिद्ध बोरगाव, मालेटाकळी, शिंदे टाकळी या गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. सेलू- वालूर रस्त्यावरील राजवाडी येथे दुधना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वालूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.