शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या खड्ड्यांमुळे चुकला शाळेचा पहिला दिवस

By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST

औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही.

औरंगाबाद : बनेवाडी येथे वर्षभरापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे विभागातर्फे नाली बनविण्याचे काम हाती घेण्यात आले; परंतु केवळ खड्डे खोदण्यापलीकडे काहीही काम झालेले नाही. त्यामुळे जवळपास १५ फूट खोल असणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना याठिकाणी घडत आहेत. या खड्ड्याने येथील एका १२ वर्षाच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस चुकविला.समीर शंकर पठारे असे या मुलाचे नाव आहे. १६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने समीरने त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने समीर १५ जून रोजी सायंकाळी घरासमोर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. परंतु खेळताना अचानक तोल गेल्याने तो समोर असणाऱ्या खड्ड्यात पडला. यावेळी त्याच्या हाताला आणि हनुवटीला मोठी इजा झाली. त्याला उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हनुवटीला झालेल्या इजामुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. आतापर्यंत त्याच्यावर जवळपास ८० हजार रुपये खर्च झाले असून, रेल्वेच्या अशा अर्धवट कामामुळे समीरवर ही वेळ आली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने नातेवाई आणि इतरांकडून पैसे घेण्याची वेळ आल्याचे समीरचे वडील शंकर पठारे यांनी सांगितले.खड्डे बुजविण्याची मागणीखड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातांची प्रशासनाने दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नितीन दाभाडे, गौतम साबळे, विकास झाल्टे, सुनील चुमकुरे, कुणाल कीर्तिशाही, पंकज भालेराव, गौतम केदारे आदींनी केली आहे.वर्षभरात अनेक जण जखमीबनेवाडी आणि राहुलनगरास जोडणाऱ्या रेल्वेपुलाच्या कामानंतर नालीसाठी खड्डे खोदण्यात आले. या खड्ड्यांच्या बाजूने वर्दळीचा रस्ता असल्याने पादचारी आणि वाहनांची ये-जा सुरू असते.अचानक तोल गेल्याने वर्षभरात अनेक जण जखमी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यातच याठिकाणी पथदिवेही नसल्याने रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत. अनेक जनावरे खड्ड्यात पडून जखमी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.निधीअभावी काम थांबलेबनेवाडी येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे; परंतु निधीअभावी काम थांबले आहे. लवकरच हे सुरू होईल.-डी. चंद्रमोहन,सहायक मंडल अभियंता, द.म.रे.मुलांकडे लक्षखड्ड्यांमुळे खेळताना लहान मुले पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवावे लागत आहे.- इंदूबाई मिसाळरेल्वेचे दुर्लक्षरेल्वेने नाल्याचे काम अर्धवट सोडून दिले. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. जखमी झालेल्या मुलाच्या उपचारासाठी रेल्वेने नुकसानभरपाई दिली पाहिजे.-शैलेश झाल्टे