गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:40 IST2025-08-11T14:30:36+5:302025-08-11T14:40:02+5:30

अफवांमुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तातडीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला

firing in Beed district, Rumors explode in Chhatrapati Sambhajinagar; Police on the run | गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव

गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेल्या गोळीबारातील गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी शनिवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या दाखल होताच नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याच दरम्यान “घाटी रुग्णालयातच गोळीबार झाला” अशी चर्चा शहरभर वाऱ्यासारखी पसरली.

बेगमपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलेला पाच पोलिसांचा खास सुरक्षा ताफा देण्यात आला, तर रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, घाटी रुग्णालयातून पोलिस नियंत्रण कक्षाला “गोळीबार” झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने शहर पोलिसांची पथके तातडीने विविध भागात रवाना झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा केला. काही वेळाने संबंधित फोनवर संपर्क साधून चौकशी केल्यानंतर हा गोळीबार छत्रपती संभाजीनगर शहरात नव्हे, तर बीड जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस दलाने सुटकेचा श्वास सोडला. जखमी महिलेची प्रकृती नाजूक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेबाबत सविस्तर चौकशी सुरू केली असून, तिच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गोळी कोणी मारली सांगता येत नाही
मी, माझे पती आणि माझी सवत आमच्यात घरगुती भांडण झाले ते मिटविताना माझ्या सवतीच्या भावाने तसेच बहिणीने मारहाण केली. त्यावेळी माझा पतीदेखील हजर होता. परंतु, मला गोळी कोणी मारली हे नक्की सांगता येत नाही, असे गंभीर जखमी महिलेने सांगितले. सदर घटना ही कुठे घडली याबाबत काही एक सांगत नाही. सदर महिलेच्या पतीने दोन लग्न केलेले असून, दोन्ही पत्नींमध्ये कौटुंबिक वाद असून गोळीबार घटनेवर जखमी महिला स्पष्ट माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: firing in Beed district, Rumors explode in Chhatrapati Sambhajinagar; Police on the run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.