शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये भरवस्तीत हॉस्पिटलच्या ICU ला आग; मृत्यूच्या दाढेतून १० रुग्ण बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:40 IST

रुग्णालयातील एसीला आग, व्हेंटिलेटरसह लाखो रुपयांचे साहित्य खाक.

छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर चौकातील गजानन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरला रविवारी (दि. २९) रात्री पावणे आठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना घडली त्यावेळी आयसीयूमध्ये पाच तर जनरल वॉर्डमध्ये पाच असे एकूण दहा रुग्ण ॲडमिट होते. आग लागल्याचे कळताच रुग्णालय प्रशासनाने सर्व रुग्णांना तातडीने शहरातील अन्य खासगी रुग्णालयात ६ ॲम्ब्युलन्समधून हलविले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. फायर ब्रिगेड जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

गजानन महाराज मंदिर चौकातील गजानन हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या आयसीयूमधील एसीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत आयसीयूतील पडदे आणि कर्टन, गाद्याने पेट घेतला. ही बाब निदर्शनास येताच उपस्थित डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व एकूण १० रुग्ण बाहेर काढून रुग्णवाहिकेतून शहरातील अन्य खासगी रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह घटनास्थळी धाव घेतली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत प्रयत्न सुरू होते. शेवटी आयसीयू युनिटच्या काचा फोडण्यात आल्यानंतर तेथे पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत आयसीयूतील सर्व व्हेंटिलेटर मॉनिटर, एक्स रे मशीन, फर्निचर, आणि अन्य साहित्याचे नुकसान झाले.

फायर एनओसी सिस्टीम आहेरुग्णालयातील आयसीयूमधून धूर निघू लागल्याचे दिसताच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयातील रुग्ण वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. फायर ब्रिगेड लगेच दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. आमच्या रुग्णालयात फायर एनओसी, फायर फायटिंग सिस्टीम आहे.-- डॉ. गितेश दळवी, रुग्णालयाचे संचालक

.... यांनी मिळवले नियंत्रणमुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, विजय राठोड, जवान रमेश सोनवणे, दीपराज गंगावणे, छत्रपती कंकणे, अशोक पोटे, शेख समीर, संग्राम मोरे, सचिन शिंदे, रवी दुथे, अमिताभकराड यांनी दोन अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

त्रुटी असणाऱ्यांना नोटीसया रुग्णालयाकडे फायर एनओसी, यंत्रणा आहे. आगीच्या घटना घडू नये, या दृष्टीने तपासणी सुरू केली आहे. त्रुटी आढळलेल्या दोन ते तीन रुग्णालयांना नोटीस बजावल्या आहेत.डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

१० दिवसांपूर्वीच 'लोकमत'ने वेधले होते लक्षओडिशातील कटक येथील ट्रॉमा आयसीयूमधील आगीत दहा रुग्णांचा मृत्यूची घटना घडली. या घटनेनंतर 'लोकमत'ने १९ मार्चला 'जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग' या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करीत रुग्णालयांच्या स्थितीकडे लक्ष वेधले होते. अनेक रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे यंत्रणेला सादर केलेली नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. त्यातून अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Hospital ICU Fire in Chhatrapati Sambhajinagar: 10 Patients Rescued!

Web Summary : A fire broke out in the ICU of a Chhatrapati Sambhajinagar hospital due to a short circuit. Ten patients were safely evacuated to other hospitals. Firefighters controlled the blaze, preventing casualties, though the ICU suffered significant damage. The hospital had fire safety measures in place.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल