शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगावरून जि.प.मध्ये खडाजंगी

By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST

बीड : वित्त आयोगाचा निधी सर्व सदस्यांना समप्रमाणात मिळाला पाहिजे, या मागणीवरुन गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

बीड : वित्त आयोगाचा निधी सर्व सदस्यांना समप्रमाणात मिळाला पाहिजे, या मागणीवरुन गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जोरदार खडाजंगी झाली. शेवटी सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले अन् निधीचे वाटप समान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच मागील बैठकीत न झालेले ठराव इतिवृत्तात आल्याने भाजपा गटनेते मदानराव चव्हाण, दशरथ वनवे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. जि.प. च्या पॅनलवर नियुक्त करावयाच्या वकिलांचा ठराव मागच्या बैठकीत चर्चेत नव्हता. मात्र, तो इतिवृत्तात उतरल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मदनराव चव्हाण यांनी तेराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला मंजूर होतो;पण निधी खर्चाचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींची अडचण होते, असा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीलाच अधिकार द्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी लावून धरली. हा ठराव मंजूर करण्यात आला. तेराव्या वित्त आयोगाच्या ४ कोटी २० लाख रुपयांच्या निधी वाटपावरुन सत्ताधारी- विरोधकांत जुंपली. भाजपाचे सदस्य आक्रमक झाल्यावर अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सर्व सदस्यांना समान निधी देण्याचे मंजूर केले.