शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 23, 2014 23:52 IST

पाटोदा: तालुक्यातील दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीला तीस वर्षानंतर यश आले आहे.

पाटोदा: तालुक्यातील दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीला तीस वर्षानंतर यश आले आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. पाटोदा शहराजवळून जाणाऱ्या मांजरा नदीवर बंधारा उभारावा, अशी मागणी गेल्यातीस वर्षापासून करण्यात येत होती. या बंधाऱ्यामुळे पाटोदा शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या पाटोदा शहराला महासांगवी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तलावाचीही पाणीपातळी घटल्याने सध्या पाटोदा येथे १५ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्यामुळे येथे आष्टी, पाटोदा, शिरूरसह इतर ठिकाणच्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे हॉटेलसह इतरही व्यवसाय आहेत. पाटोदा येथे पाणीटंचाई असल्याने या व्यवसायीकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. तर, येथील महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथे पाण्याच दुर्भिक्ष असल्याने मांजरा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी केली जात होती. याचा विचार करून शासनाने पाटोदा शहराजवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ७४ लाख ९८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे येथील लघुपाटबंधारे विभागातील प्रभारी उपअभियंता घोळवे यांनी सांगितले. या बंधाऱ्यामुळे पाटोदा परिसरातील घोलपवाडी, जाधववस्ती, काळुसे वस्ती, गर्जेवस्ती, धनगर जवळका, गितेवाडी येथील पाण्यासह शेतीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. या बंधाऱ्यामुळे या परिसरातील दोनशे हेक्टरवरील शेतीस फायदा होणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत घोलप, गणेश शेवाळे यांनी सांगितले. पाटोदा येथे कोल्हापुरी बंधारा करण्यासाठी गेल्या वीस वर्षापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हापासून नागरिकांना बंधाऱ्याची आस होती. आता, या कामास मंजुरी मिळाल्याने नागरिकांची जीव भांड्यात पडला आहे. पाटोदा तालुक्यातील पांचग्री येथेही मांजरा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यास मंजुरी देण्यास आली आहे. या कामासाठी ७० लाख ६१ हजार ९०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या बंधाऱ्यामुळेही पाचंग्री, पाचेगाव, घुलेवस्ती येथील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या बंधाऱ्यांची उंची ६.०५ मीटर राहणार असून बंधाऱ्यास प्रत्त्येकी १८ दरवाजे बसविण्यात येणार आहेत.पुणे येथील लघुसिंचन विभागाचे सहाय्यक मुख्य अभियंता एस. के. चौधरी यांचे या बंधाऱ्याच्या मंजुरी संदर्भातील पत्र जिल्हा परिषदेस मिळाल्याचेही सूत्रांनी सांगितले. या संदर्भात प्रभारी उपअभियंता घोलप म्हणाले, बंधाऱ्यास मंजुरी मिळाली असून इतर कामास आता लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. (वार्ताहर)