उटीतील ५ वर्ग भरतात उघड्यावर

By Admin | Updated: September 10, 2014 00:47 IST2014-09-10T00:34:28+5:302014-09-10T00:47:51+5:30

औसा : शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील कुणी ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही़ याची काळजी शासन घेत आहे़ पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उटी (बु.) शाळेचे

Fill up to 5 classes in the open | उटीतील ५ वर्ग भरतात उघड्यावर

उटीतील ५ वर्ग भरतात उघड्यावर


औसा : शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील कुणी ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही़ याची काळजी शासन घेत आहे़ पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उटी (बु.) शाळेचे पाच वर्ग आज उघड्यावर भरत आहेत़ इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे़ वर्षभरापासून इमारत दुरुस्तीची मागणी करुन ही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप सरपंच अ‍ॅड. भालचंद्र पाटील यांनी केला आहे़
औसा तालुक्यातील उटी (बु.) हे दोन ते आडीच हजार लोकसंख्येचे गाव गावात जिल्हा परिषदेची १ ली ते ७ वी पर्यंतची शाळा या शाळेत १८७ विद्यार्थी शिक्षण घेतात़ या शाळेमध्ये १ मुख्याध्यापक व ७ शिक्षक आहेत़ शाळेसाठी ७ वर्गखोल्या व १ कार्यालय अशा ८ खोल्या आहेत़ पण ८ मधील पाच वर्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे़ पाच खोल्याच्या छताचा स्लॅब निखळला आहे़ आजही अधुन-मधुन छत निखळून पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक ही वर्गात बसायला तयार नाहीत़ त्यामुळे शाळेचे पाच वर्ग उघड्यावर किंवा व्हरांड्यात भरविण्याची वेळ आली आहे़
शासन एकिकडे प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे़ तर दुसरीकडे उटी (बु.) शाळेतील पाच वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे़
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत म्हणून ते भाषण कुठे बसून ऐकावे असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भेडसावला़ (वार्ताहर)
उटी (बु.) चे सरपंच अ‍ॅड भालचंद्र पाटील या संदर्भात बोलताना म्हणाले कि, मागील वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व्हावी म्हणून निवेदने दिली़ प्रत्यक्ष भेटी घेतल्या पण अजुनही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे़
४या संदर्भात गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण संपर्क होऊ शकला नाही़

Web Title: Fill up to 5 classes in the open