शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवारांची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST

करंजखेड : कन्नड तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायत ही सतरा सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळत ...

करंजखेड : कन्नड तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायत ही सतरा सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळत आहे. काही वॉर्डात तिरंगी तर काही वॉर्डांत दुरंगी सामना होत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील काही नेतेमंडळी आपले नातेवाईक निवडून कसे येतील, यासाठी आटापिटा करीत आहेत. एकूण १७ जागांसाठी ४९ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहेत.

करंजखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत रिंगणात ४८ उमेदवार निवडणूक लढवत असून कोठे तिरंगी, तर कोठे दुरंगी सामना रंगला आहे. प्रथमच उमेदवार म्हणून तरुणांनी सहभाग घेतल्यामुळे गावातील प्रस्थापितांची चांगलीच दमछाक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते एकत्र येऊन भाजप पॅनलला विरोध करीत आहेत. या निवडणुकीत राष्टवादी काँग्रेसचे कन्नड नगराध्यक्ष संतोष कोल्हे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शेख कलिमोद्दीन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचितराव वळवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हाजी गुलाम मोहमद हे नेतृत्व करीत आहेत. भाजप तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे व संरपच सय्यद अय्यास यांनी भाजपपुरस्कृत, तर उपसरपंच हर्षवर्धन निकम, बुढण मुल्ला यांनी ही स्वतंत्र पॅनल उभे केले. निवडणूक अंतिम टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून मतदारांच्या घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

इन कमिंग का आऊट गोइंग

विद्यमान सरपंच सय्यद हय्यास व उपसरपंच हर्षवर्धन निकम हेही उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. विकास कामांवर मतदान मागत आहेत. यामुळे इन कमिंग की सत्ता बदल म्हणून आऊट गोइंग होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

-------------

फोटो : ग्रामपंचायत करंजखेड