पंधरा दिवसांत बेचाळीस शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By Admin | Updated: January 20, 2015 01:28 IST2015-01-20T01:16:50+5:302015-01-20T01:28:03+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात गेल्या पंधरा दिवसांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे

Fifty-three days, forty-two farmers ended their lives | पंधरा दिवसांत बेचाळीस शेतकऱ्यांनी संपविले जीवन

पंधरा दिवसांत बेचाळीस शेतकऱ्यांनी संपविले जीवन

 

औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात गेल्या पंधरा दिवसांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४ आणि नांदेड जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच सरलेल्या वर्षात मराठवाड्यात ५११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आता नवीन वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. दुष्काळामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले. रबी पिकांची पेरणीही झाली नाही. दोन्ही पिके हातची गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने वैयक्तिक मदत जाहीर केली असली तरी ही मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे नवीन वर्षातही अनेक शेतकरी कंटाळून आत्महत्या करीत आहेत. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. ही रक्कम नेमकी कुठे जात आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे.

Web Title: Fifty-three days, forty-two farmers ended their lives