वाळूजजवळ भरधाव आयशर ट्रॅक्टरला धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:25 IST2018-12-05T23:24:43+5:302018-12-05T23:25:07+5:30
वाळूज महानगर : उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भरधाव आयशरने धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास वाळूजजवळ ...

वाळूजजवळ भरधाव आयशर ट्रॅक्टरला धडकला
वाळूज महानगर : उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भरधाव आयशरने धडक दिल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास वाळूजजवळ घडली. यात आयशर चालक जखमी झाला.
नायगाव-बकवालनगर शिवारातून ऊस घेऊन ट्रॅक्टर मंगळवारी रात्री कारखान्याकडे जात होता. ट्रॅक्टर टीसीआय गोदामाकडून पंढरपूरच्या दिशेने वळण घेत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास नगरकडे भरधाव जाणाºया आयशरने (एम.एच.१२, के.पी.५१९९) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.
यात आयशर चालक संतोष नामदेव शेजोळे (रा. मुक्ताईनगर, जळगाव) हा जखमी झाला आहे. ट्रॉलीतील ऊस रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. वाळूज पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॉली बाजूला घेत रस्त्यावर पडलेला ऊस नागरिकांच्या मदतीने इतरत्र हटवून वाहतूक सुरळीत केली. या अपघातप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.