विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन रविवारी

By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:36:11+5:302014-12-25T00:47:00+5:30

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

Festive Art Competition Sunday for Students | विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन रविवारी

विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशन रविवारी

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वतीने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेस्टिव्ह आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २८ डिसेंबर, रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमत भवन, जालना रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक गटाला ठराविक विषय देण्यात आला
आहे.
यात नर्सरी ते सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी रंग भरा ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची वेळ स. १० ते ११.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कच्चे रेखाटन आयोजकांकडून पुरविण्यात येणार आहे. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ग्रीटिंग कार्ड या विषयाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची वेळ १० ते ११.३० वाजेपर्यंत असेल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आवश्यक ए-३ साईज पेपर आयोजकांकडून पुरविला जाईल, बाकीचे आवश्यक सजावटीचे सामान स्पर्धकांनी सोबत आणावे. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पॉट डेकोरेशन ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेची वेळ स. १० ते ११.३० वाजेपर्यंत इतकी नियोजित करण्यात आली आहे. तसेच या गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून शुभेच्छापत्र बनविणे ही स्पर्धा ११.३० ते १.०० वाजेपर्यंत या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रॉप पेपरपासून ख्रिसमस ट्री बनविणे ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेची वेळ ११.३० ते १.०० वाजेपर्यंत अशी आहे. गटातील स्पर्धकांनी आवश्यक ते सर्व सामान स्वत: आणावे.
या स्पर्धेमधून प्रत्येक गटातून ३ पारितोषिके काढण्यात येतील. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रही देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी स्पर्धकांनी डेकोरेशनसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य सोबत आणावे. कॅ म्पस क्लबच्या सदस्यांसाठी या स्पर्धेत मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यांच्यासोबत कॅम्पस क्लबचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. तसेच कॅम्पस क्लबचे सदस्य नसणाऱ्या सदस्यांसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ९०११४९८७७९ या नंबरवर संपर्क साधावा.

Web Title: Festive Art Competition Sunday for Students