शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जुनाट ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा घाट

By admin | Updated: August 19, 2014 02:17 IST

औरंगाबाद : औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थानकामध्ये दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कॅमेरे असून,

औरंगाबाद : औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थानकामध्ये दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या स्थानकाच्या जुन्या इमारतीत ९ सीसीटीव्ही कॅमेरे असून, नवीन इमारतीसह स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी जवळपास ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु प्रत्यक्षात नवीन आणि अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याऐवजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील स्थानकातील काढलेले जुनाट कॅमेरे मॉडेल रेल्वेस्थानकात बसविण्याचा घाट घातला जात आहे.मॉडेल रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत कामकाज सुरू होऊन मोठा कालावधी होऊनही अद्याप याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असताना दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रेल्वेस्थानकात चोरट्यांचा वावर असल्याने प्रवाशांच्या बॅग्ज, पाकिटे, दुचाकी आदींची चोरी तसेच संशयित व्यक्ती, अन्य वस्तूंबाबत सतर्क राहून त्याबाबत तात्काळ योग्य ती पावले उचलण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरतात. रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत विविध ठिकाणी ९ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिवाय जुन्या इमारतीत सीसीटीव्ही रूमदेखील आहे. परंतु नव्या इमारतीत कॅमेरे नसल्याने परिसराची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती दिसून येते. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत; परंतु जुनाट कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने त्यांचा कितपत उपयोग होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.नांदेड रेल्वेस्थानकातील कॅमेरे?नांदेड रेल्वेस्थानकात नुकतेच अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथील पूर्वीचे कॅमेरे औरंगाबाद स्थानकात बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय मे महिन्यात औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या पाहणी दौऱ्यात दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही नांदेड रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली होती.संशयित व्यक्तींच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा दर्जा महत्त्वाचा आहे; परंतु जुने कॅमेरे बसविण्यात आल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवीन आणि आधुनिक कॅमेऱ्यांची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष क रून अन्य स्थानकातून काढलेले कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती देता येणार नाही, जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे सांगण्यात आले.