शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएच्या तपासणी मोहिमेचा फार्स !

By admin | Updated: July 30, 2015 00:15 IST

जालना : अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळीच्या प्रकारसोबतच अन्न पदार्थांची निर्मिती शास्त्रीय पद्धतीने होते का यासाठी इतर मुद्यांचा तपास करण्यासाठी

जालना : अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळीच्या प्रकारसोबतच अन्न पदार्थांची निर्मिती शास्त्रीय पद्धतीने होते का यासाठी इतर मुद्यांचा तपास करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन आहे. मात्र हा विभाग थातूरमातूर कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने गत तीन महिन्यात जिल्ह्यात फक्त १५ नमुने तपासले. या वरुनच प्रशासन किती सजग आहे याची कल्पना येते. जालना शहरातच छोटी मोठी मिळून ५०० पेक्षा अधिक हॉटेल्स, उपहारगृहे, स्वीटमार्ट, ढाबे आहेत. या ठिकाणी जनतेच्या आरोग्याची काळजी किती घेतली जाते ही सर्वश्रुतच आहे. सर्व प्रतिष्ठानांची अन्न व औषधी प्रशासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे असतानाही याकडे कानाडोळा होत आहे. अनेक उपहारगृहे तसेच हॉटेल्स व ढाब्यांवर जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. स्वच्छतेच्या मुद्यांसह अनेक बाबी धोकादायक असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यात विभागाने फक्त १५ नमुने तपासले. त्यात प्रमाणित ९ तर अप्रमाणित ६ नमुने आढळून आले. या प्रकरणी १ जणावर खटला दाखल करण्यात आला. गतवर्षी १३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ११३ प्रमाणे प्रमाणित तर १८ अप्रमाणित निघाले. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध खटला दाखल झाला. याविषयी अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त अभय देशपांडे म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे मोहीम राबविण्यास अडचणी येत आहेत. १ आॅगस्टपासून मोहीम राबविली जाईल. (प्रतिनिधी)