मुलीवरील अत्याचाराचा जाब विचारण्यास गेलेल्या मजूर महिलेवर आरोपीच्या पित्याचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 13:20 IST2022-04-02T13:16:13+5:302022-04-02T13:20:21+5:30

पीडिता गेल्या काही दिवसांपासून आरोपी यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात आपल्या दोन्ही मुलींसह ऊसतोडणीच्या कामास आहे.

Father and son raped a woman, including a minor girl | मुलीवरील अत्याचाराचा जाब विचारण्यास गेलेल्या मजूर महिलेवर आरोपीच्या पित्याचा अत्याचार

मुलीवरील अत्याचाराचा जाब विचारण्यास गेलेल्या मजूर महिलेवर आरोपीच्या पित्याचा अत्याचार

शिऊर : पस्तीसवर्षीय महिलेसह तिच्या पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर पिता-पुत्र गेल्या चार वर्षांपासून वेळोवेळी बळजबरीने अत्याचार होत असल्याची घटना पुढे आली आहे. यासह पीडित महिलेच्या बारावर्षीय मुलीसही तिला लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि.१) शिऊर पोलीस ठाण्यात जिब्राईल बाबू शेख, अन्वर जिब्राईल शेख, सेहनाज जिब्राईल शेख (रा.वडजी ता.वैजापूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता गेल्या काही दिवसांपासून आरोपी यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात आपल्या दोन्ही मुलींसह ऊसतोडणीच्या कामास आहे. यादरम्यान आरोपी अन्वर शेख याने पीडितेच्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीवर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत फिर्यादीने आरोपी अन्वर याचे वडील जिब्राईल शेख यांच्याकडे तक्रार केली. पण, जिब्राईल शेख यानेसुद्धा फिर्यादीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. आरोपी पिता-पुत्राने पीडितेच्या बारावर्षीय मुलीससुद्धा लज्जा वाटेल, असे कृत्य करून विनयभंग केल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी या तिघींनाही घरात डांबून ठेवत त्यांना मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत फिर्यादीच्या अल्पवयीन पंधरावर्षीय मुलीस दिवस गेल्याचे पुढे आले होते. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून तिचा गैरकायद्याने गर्भपात केला असल्याची तक्रारी नोंदविण्यात आली आहे. यावरून शिऊर पोलीस ठाण्यात जिब्राईल बाबू शेख, अन्वर जिब्राईल शेख, सेहनाज जिब्राहिल शेख (रा. वडजी ता. वैजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे घटनास्थळ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हद्दीत असल्याने प्राथमिक तपास पो.उ. निरीक्षक अंकुश नागटिळक करीत आहे.

 

Web Title: Father and son raped a woman, including a minor girl