शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: July 12, 2014 01:15 IST

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत आणि शेतकऱ्यांनाही त्यांचा शेतमाल थेट विक्री करता यावा, यासाठी आता प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे पंचायत समितीसमोर या थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याठिकाणी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा आणि ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. नारनवरे यांनी केले.महागाईवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग आणि पणन विभाग यांच्या सहकार्याने आता जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात शेतकरी आणि शेतकरी गटांमार्फत थेट शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना योग्य भावात अन्नधान्य, फळभाज्या, फळे मिळू शकतील, असे यावेळी डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्या प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरात बार्शी नाका येथेही विक्री केंद्र सुरु होणार आहे. तुळजापूर येथे नळदुर्ग आणि तुळजापूर येथील पंचायत समिती परिसरात, उमरगा येथे कृषी चिकित्सालय आणि मुख्य रस्त्यालगत अशी दोन तर भूम येथे समर्थ नगर, परंडा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि मुख्य रस्ता, बार्शी रोड तर कळंब येथे नगरपालिका जवळ आणि द्वारकानगरी सोसायटी, शिवाजी चौक, कळंब येथे ही थेट शेतमाल विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक शहरात होणार दोन केंद्रांची निर्मिती जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र १ हजार ७०६ एवढे आहे. सरासरी उत्पादकताही १७.०१ टन प्रति हेक्टरी अशी आहे तर एकूण उत्पादन हे २९ हजार ३० टन इतके आहे. या भाजीपाला पिकांमध्ये मुख्यत: पालेभाज्या, वांगे, टोमॅटो, गवार, मुळा, पडवळ, घेवडा, कारले, दोडका, भोपळा, बटाटा, काकडी आदी मुख्य भाजीपाला पिकांचा समावेश होतो. याशिवाय, मसाला पिकाखालील क्षेत ६ हजार १२८ हेक्टर इतके आहे. कांदा, लसूण, अद्रक, हळद ही पिके मसाला पिके म्हणून घेतली जातात. सरासरी उत्पादकता १६.५१ टन प्रति हेक्टरी अशी आहे. जिल्ह्यात एकूण ९ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. यापैकी केवळ उस्मानाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक होऊन लिलावाद्वारे त्याची विक्री केली जाते. तसेच जिल्ह्यातील ५४ आठवडी बाजारामध्येही शेतकरी त्यांच्या भाजीपाला पिकाची विक्री करतात. आताच्या या थेट शेतमाल विक्री केंद्राचा लाभ आता शेतकऱ्यांना घेता येणार असल्याने संबंधित शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे.