शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांंचे वीजबिल होणार माफ

By admin | Updated: May 24, 2014 00:45 IST

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे.

रामेश्वर काकडे, नांदेड गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे वीजबिल शासन माफ करणार आहे. मात्र यासाठी तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत यादीतील कृषीपंपधारक शेतकर्‍यांनाच वीजबिलमाफीचा लाभ मिळणार असल्याचे महावितरणच्या अधिकृत सूत्राकंडून सांगण्यात आले. जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे जानेवारी ते जून या कालावधीत वीज देयक शासन अदा करणार आहे़ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले असून गारपीटग्रस्तांचे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज देयक माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ यासाठी शासनाने २०० कोटींची तरतूद केलेली आहे़ महूसल व कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील गारपीटग्रस्तांनाच वीजबीलमाफीचा फायदा मिळणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करण्यात येणार नाही. ज्या शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत कर्जाची परतफेड केली. अशा शेतकर्‍यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार पीक कर्जाची उचल केल्याच्या दिनांकापासून ३६५ दिवसात पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ज्या बाधित शेतकर्‍यांनी ३० जून २०१४ पर्यंत पीककर्जाची परतफेड केल्यास अशा शेतकर्‍यांचे नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीककर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. बाधित शेतकर्‍यांच्या कर्जाचे तीन वर्षांकरिता म्हणजेच सन २०१४-१५, २०१५-१६, १०१६-१७ या कालावधीकरिता शेती पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. आणि पुनर्गठनाचा पर्याय स्विकारलेल्या शेतकर्‍यांचे पुनर्गठनापूर्वीचे व्याज शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी पाठविलेल्या अधिकृत यादीतील शेतकर्‍यांनाच वीजबील माफीचा लाभ मिळेल. गारपिटीचे महसूल व कृषी विभागाद्वारे झालेल्या सर्वेक्षणानंतर अंतिम यादी तयार झाली आहे़ यामधील कृषीपंपधारक शेतकर्‍यांना वीज देयक माफीचा लाभ मिळणार असून यादीत नाव नसलेल्या शेतकर्‍यांना वीजदेयके माफीचा लाभ मिळणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. बाधित शेतकर्‍यांच्या शेतीपिकावरील कर्जाची परतफेड करण्यास डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या कालावधीपर्यंत बाधित शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्यात येणार नाही.