शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST

कडा : आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या पीकविमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तलाठी सज्जावर खेटे घालत आहेत.

कडा : आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या पीकविमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तलाठी सज्जावर खेटे घालत आहेत. काही तलाठी सज्जावर दररोज येत नाहीत तर काहींनी अनधिकृत रायटर ठेवलेले आहेत. असे रायटर शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांची पिळवणूक करीत आहेत.आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी ४५ तलाठी आहेत. तलाठी कार्यालयातून सातबारा, आठ अ , जमिनीची खरेदी- विक्री केल्याची नोंद, पीक पेरा घेणे, शेतसारा आदी कामे होतात. तलाठी सज्जांसाठी तालुक्यात दर्जेदार इमारतीही बांधण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी तलाठी संबंधित सज्जावर न राहता आष्टी, कडा सारख्या शहरातच राहत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गव्हाणे यांनी सांगितले. तालुक्यातील काही तलाठ्यांनी आष्टी, कडा येथे किरायाने खोल्या केल्या आहेत. व तेथेच आपले तलाठी कार्यालय थाटले आहे. वास्तविक तलाठ्यांनी ज्या ठिकाणी सज्जा आहे तेथे जाणे बंधनकारक आहे. मात्र असे असले तरी तलाठ्यांनी अनधिकृत कार्यालये थाटल्याने ग्रामस्थांना नाहक शहरात खेटे मारावे लागत आहेत.सध्या पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकरी तलाठ्यांकडे खेटे घालत आहेत. तलाठी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासही अनेक अडचणी येत आहेत. तालुक्यातील काही तलाठ्यांनी सातबारा देण्यासह इतर कामे करण्यासाठी अनधिकृत रायटर ठेवलेले आहेत. तलाठी कार्यालयात आले नाहीत अशा वेळी हे अनधिकृत ठेवलेले रायटरच तलाठ्यांची मिजास मिरवितात. अनेकदा असे रायटर शेतकऱ्यांना उद्धटपणे वागणूक देत असल्याचे व कागदपत्र देण्यात जाणीवपूर्वक अडचणी आणत असल्याचा आरोप सचिन वाघुले यांनी केला. तलाठ्यांनी अनधिकृत ठेवलेले रायटर सातबारा देणे, आठ अ, पिक पेऱ्याची नोंद करणे अशी कामे करतात. मात्र सदरील कागदपत्र देण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप अशोक वाघुले यांनी केला. जमिनीची खरेदी विक्री संदर्भातील नोंद करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये तर इतर कागदपत्र देण्यासाठी पन्नास ते १०० रुपये उकळले जात असल्याचे रवि पाटील ढोबळे यांनी सांगितले. तलाठ्यांनी सज्जावर राहावे, अशा सूचना गेल्या महिन्यातच तहसीलदारांनी दिल्या होत्या. मात्र तलाठ्यांनी पुन्हा आता अपडाऊन सुरू केल्याने शेतकऱ्यांचे हाल कायमच आहेत. याबाबत तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले की, चौकशी करून सज्जावर न राहणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करू असे सांगितले. (वार्ताहर)पीकविमा भरण्यासाठी धावपळ अनेक तलाठ्यांनी आपले कार्यालय थाटले कडा, आष्टी, धानोरा सारख्या शहरात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी तलाठ्यांच्या कार्यालयात घालावे लागतात खेटे.तलाठ्यांनी अनधिकृत ठेवलेले रायटर शेतकऱ्यांकडून उकळतात अव्वाच्या सव्वा पैसे.मुख्यालयी न राहणाऱ्या व अनधिकृत कार्यालय सुरू करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई होणार