शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची पिळवणूक

By admin | Updated: May 21, 2014 00:49 IST

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत.

मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांकडून रासायनिक खताच्या पक्क्या पावती शिवाय खत देण्यात येवून मुळ किंमती पेक्षा जास्त दराने खुलेआम विक्री होत आहे़ आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याची खत खरेदीतही लुबाडणूक करण्यात येत आहे़ यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचे चिन्हे हवामान विभागाकडून वर्तविले जात असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी रासायनिक खत खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत़ परंतु, कृषी केंद्र चालकांकडून शेतकर्‍यांची अधिक मागणी असलेल्या खतांच्या गोणी मागे ५० ते २०० रूपयांपर्यंत अधिकचा दर सांगण्यात येत आहे़ खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना रासायनिक खताची गरज भासते़ ऐनवेळीच बाजारात खताची कृत्रिम टंचाई होण्याचा अनुभव शेतकर्‍यांना असल्यामुळे अगोदरच खत खरेदी करण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे़ परंतु, मागणी असलेल्या खताच्या गोणी मागे अधिकचे दर वसूल करून कच्च्या पावत्या कृषी केंद्र चालकाकडून दिल्या जात आहेत.सेलू व ग्रामीण भागातील वालूर सारख्या मोठया गावातील कृषी केंद्र चालकांनी विविध रासायनिक खताचा मोठया प्रमाणावर साठा करण्यात आला आहे़ जादा दराने बियाणे व खत विक्री करणार्‍या दुकानदारावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी बाजारात मात्र बिनधास्तपणे जादा दराने खत विक्री केली जात आहे़ खताशिवाय सोयाबीन, काही कापूस बियाणांच्या पाकिटाची जादा दराने विक्री सर्रासपणे होत असल्याचे चित्र आहे़ युरिया, डि़ए़पी़ सुपर फ ॉस्फ ेट, १०:२६:२६ या आर सी एफ व नामांकित कंपनीच्या खतांना शेतकर्‍यांकडून मागणी अधिक आहे़ मान्सूनच्या तोंडावर खत खरेदीची शेतकर्‍यांची लगबग सुरू असतानाच अधिकचा दर वसूल केल्या जात असल्यामुळे शेतकर्‍यांचा नाईलाज झाला आहे. बाजारात रासायनिक खतांची चढया भावाने विक्री केली जात आहे़ दुकानदारांकडून शेतकर्‍यांना कच्च्या पावत्या देण्यात येत आहेत.बियाणे व खताविषयी शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कुठलीही माहिती व मार्गदर्शन मिळत नाही़ काही शेतकरी या बाबत चौकशी करतात मात्र संबंधित विभागाकडून कानावर हात ठेवले जातात़ गतवर्षी खरीप व रबी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हे दोन्हीही हंगाम शेतकर्‍यांच्या दृष्टीने लाभदायक नव्हते़ रबी हंगामात गारपीटीने हातची पिके गेली. या वर्षी खरीप हंगामात गतवर्षीची कसर भरून काढण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांचा आहे परंतु, खरीप हंगामासाठी लागणार्‍या रासायनिक खत खरेदीत अधिकचा दर शेतकर्‍यांना मोजावा लागत आहे़ सर्वसामान्य शेतकरी खत मिळेल की नाही या भीतीपोटी अगोदरच खत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.