शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांमुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST

शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़

शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़ रात्रीतून उभी पिके फस्त होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीसुद्धा पिकांचे संरक्षण करण्यासाठी खडा पहारा देण्याची वेळ आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़यंदा अल्प पर्जन्यमान झाले आहे़ परिणामी, रबीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली नाही़ एकुण ११ हजार हेक्टर्सपैकी ५ ते ६ हेक्टर्समध्ये रबी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल, भूईमुग, मका अशी पिके घेण्यात आली आहेत़ ज्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याची सुविधा आहे, असे शेतकरी दिवसरात्र एक करुन रबी पिकांची जोपासना करीत आहेत़ या पिकांवर रान-पाखरांचे थवेच्या थवे उतरत असून, रान-पाखरे सुद्धा पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत़ विशेषत: ज्वारी, गहू यांचे टपोरे दाणे फस्त करीत आहेत़ त्यातच आता या पिकांवर नवे संकट आले आहे़ रानडुकरे रात्रीच्यावेळी ज्वारी, गहू, भूईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ त्याचबरोबर उभे पिक फस्त करीत आहेत़ ज्वारीची कणसे, गव्हाच्या तोरंब्या, भूईमूगाच्या शेंगा खाऊन शेती ओसाड करीत आहेत़ त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत़ दिवसा येणाऱ्या रान-पाखरांचा बंदोबस्त करण्यासाठी दिवसभर शिवारात पाखरे हाकरण्याचा आवाज येत असून, गोफणी भराभर फिरत आहेत़ परंतु रानडुकरांचे हल्ले कसे थांबवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ (वार्ताहर)