शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

By admin | Updated: August 1, 2014 00:30 IST

हिंगोली : व्यापाऱ्यांच्या सवडीप्रमाणे होणाऱ्या लिलावाची समस्या अद्यापही सुटलेली नाही. परिणामी, दोन दिवसांपासून लिलावाची वाट पाहणाऱ्या उत्पादकांचा गुरूवारी संयम सुटला.

हिंगोली : व्यापाऱ्यांच्या सवडीप्रमाणे होणाऱ्या लिलावाची समस्या अद्यापही सुटलेली नाही. परिणामी, दोन दिवसांपासून लिलावाची वाट पाहणाऱ्या उत्पादकांचा गुरूवारी संयम सुटला. जवळपास पन्नास शेतकऱ्यांनी बाजार समितीत गोंधळ सुरू केला. तातडीने शहर ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेवून शेतकऱ्यांना शांत केले.काही उत्पादक दोन तर काही कालपासून लिलावाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी दिवसभर लिलाव झाला नाही. दरम्यान दुपारी आलेल्या पावसात बहुतांश उत्पादकांचा माल भिजला. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत लिलावास सुरूवात झाली नव्हती. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची चिन्हे दिसू लागल्याने उत्पादक संतापले. आजही माल भिजण्याची शक्यता असल्यामुळे पन्नास शेतकऱ्यांनी बाजार समितीत धाव घेतली. तेथे सचिव नसल्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. महिती मिळताच शहर ठाण्याची गाडी दाखल होताच शेतकरी शांत झाले. नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. (प्रतिनिधी)पुन्हा तोच प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापाऱ्यांत शेडमध्ये माल ठेवण्यावरून संघर्ष सुरू आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल लवकर उचलला जात नाही. तर शेतकऱ्यांनी आणलेला माल ठेवण्यास जागाही नाही. बीट वेळेवर होत नाही. बाजार समितीही या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवून उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.