शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:26 IST

मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

ठळक मुद्देगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोपगणपतराव देशमुख : जनआंदोलन उभारणारलोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद (भाई उद्धवराव पाटील नगरीतून) : मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे ही आश्वासने पदरात पाडून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज आ. गणपत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.शेतकरी कामगार पक्षाच्या १७ व्या राज्य अधिवेशनाचा गुरुवारी समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेकानंद पाटील, आ. पंडित पाटील, प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, संजीवनी हंडे, एस. व्ही. जाधव, राजेंद्र कोरडे, जे. एम. म्हात्रे, शांताराम कुंजीर, प्रा. एस. व्ही. जाधव, संपतराव पवार, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, विकास शिंदे, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.आ. देशमुख म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी, तर हमीभाव न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही विचार आहेत. दोन्ही पक्ष समविचारी असून, त्यांच्यासोबत जाऊन भाजपचे राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले.आ. जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात शेतकरी कामगार पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करण्यात येतील. सर्वांना सोबत घेऊन जाण्यासह विचारांचे राजकारण करावे लागेल. या कामी कार्यकर्ते घडविण्यासाठी वर्षभरात शंभर प्रशिक्षित कार्यकर्ते घडविण्यात येतील. शेतकरी कामगार पक्ष वाढीसाठी बुथ पातळीपासून काम करावे लागणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कामाची फूट पट्टी मोजावी लागेल. आता पक्षाचे काम करणाºयासच पदे देण्यात येतील. राज्यात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या ४८ टक्के नागरीकरण झाले आहे. ग्रामीणसह या भागाचाही विचार, पक्षाचे विचार रुजविण्यासाठी करावा लागणार आहे. शिक्षण, सहकारी आदी क्षेत्रात आघाड्या निर्माण कराव्यात लागतील.राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे असून, राज्य घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. मनुवादी घटना आणण्याचा सत्ताधाºयांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. पाटील यांनी यावेळी केला.प्रवीण गायकवाड म्हणाले की, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न सुटावा, जनविरोधी शिक्षण कायदा बंद करा, आगामी पंचवार्षिक योजनेत शिक्षणावर अधिक तरतूद करण्याची गरज आहे, तर राज्य सरकारच्या कामाचे आॅडिट झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. समारोप कार्यक्रमात सर्वच नेते व वक्त्यांनी मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी लावून धरली. तसेच धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. जिल्ह्याचे चिटणीस काकासाहेब शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अधिवेशनास राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख