गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने व्यवस्था केली होती. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने, तर फुलंब्री शहरात नगरपंचायतीने नियोजन केले होते. त्यास पोलीस प्रशासनाचेदेखील सहकार्य केले. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मूर्ती संकलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मीक जाधव, बाबासाहेब शिनगारे, गणेश राऊत, अजय शेरकर, आदींची उपस्थिती होती.
-----
किनगावात ग्रामपंचायतीने केली तयारी
किनगावात ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच किशोर चव्हाण, प्रशांत चव्हाण, अनिल चव्हाण, श्रीकांत चव्हाण, सुरेश सोनवणे, गणेश चव्हाण, झुंजार चव्हाण, उमेश चव्हाण, शेख रज्जाक, विनोद सोनवणे, चंद्रकांत देशफिरे, आदींची उपस्थिती होती.