शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

नेलवाडमध्ये महिलांच्या हस्ते झाले ७ ठिकाणी ध्वजारोहण

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा तालुक्यातील नेलवाड गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, गावात ७ ठिकाणी ध्वजारोहण झाले़ या सातही ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करुन

गोविंद इंगळे , निलंगानिलंगा तालुक्यातील नेलवाड गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, गावात ७ ठिकाणी ध्वजारोहण झाले़ या सातही ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करुन एक आगळा-वेगळा पॅटर्न समाजासमोर नेलवाड गावाने उभा केला आहे़ गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण सरपंच विद्याताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले़ पोलिस पाटील कार्यालयातील ध्वजारोहण पोलिस पाटील शिवाजीराव यांच्या सौभाग्यवती सरोजनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ तर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच विद्याताई यांच्या हस्ते झाले़ सार्वजनीक ध्वजारोहण जि़प़सदस्या सुष्मा फुलसूरे यांच्या हस्ते करण्यात आले़ नेलवाडच्या समाजमंदीरातील ध्वजारोहण पंचशीला दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले़ तर जि़प़ शाळेत मुख्याध्यापक एम़एम़जाधव यांच्या ऐवजी त्यांच्या सहकारी शिक्षिका एम़व्हीग़ाजी यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आली़ महाराष्ट्र विद्यालय या खाजगी शाळेतील ध्वजारोहणही मुख्याध्यापकाऐवजी सरपंच विद्याताई जाधव यांच्या हस्ते झाले़ सार्वजनीक वाचनालयात वाचनालयाच्या सचिव मिराबाई धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़अंगणवाडी क्रमांक ३ मधील इमारतीचे उद्घाटनही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले़ जि़प़सदस्या सुष्मा फुलसूरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाला़ शालेय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाणपत्र देऊन सुष्माताईच्या हस्ते करण्यात आला़ महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम नेलवाड गावात राबविल्याने सर्वत्र कौतुक होत असून, जिच्या हाती ध्वजाची दोरी, ती राष्ट्राला उद्धारी , असे कौतुक उद्गार यावेळी काढण्यात आले़ शासनाने महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण दिले असले तरी नेलवाडच्या ग्रामस्थांनी ध्वजारोहणाला १०० टक्के संधी दिली़ हा एक आदर्श असल्याचे राजेंद्र धुमाळ, वाचनालयाचे अध्यक्ष किसनराव धुमाळ म्हणाले़यावेळी बजरंग जाधव, अरुणा धुमाळ, बेबीताई मुळे, दिनकर जाधव, ज्ञानेश्वर भोसले, हुलसूरे गुरुजी, व्ही़जे़पोतदार, शिवाजीराव पाटील आदींची उपस्थिती होती़