शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता निविदेला प्रतिसादाची अपेक्षा

By admin | Updated: July 13, 2017 00:27 IST

नांदेड: शहर स्वच्छतेसाठी पहिल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने आता दुसऱ्यांदा ई-निविदा मागविण्यात आल्या असून या निविदांना कितपत प्रतिसाद मिळतो

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहर स्वच्छतेसाठी पहिल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने आता दुसऱ्यांदा ई-निविदा मागविण्यात आल्या असून या निविदांना कितपत प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे़ २८ जुलैपर्यंत शहर स्वच्छतेसाठी ई-निविदा स्वीकारल्या जाणार आहेत़शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या ए टू झेड या कंत्राटदाराने ३१ मार्च रोजी कामबंद केल्यानंतर शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न उद्भवला होता़ अनेक भागात साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उद्भवला होता़ एकवेळा नाही दोनवेळा नाही तर तब्बल ५ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर दोन निविदा प्राप्त झाल्या़ या निविदाधारकांशी प्रशासनाने चर्चा केली़ मात्र ही चर्चा निष्फळ ठरली़ दर आणि कंत्राटदाराची पात्रता यांचा मेळ लागलाच नव्हता़ त्यामुळेच नव्याने निविदा मागविल्याची माहिती स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त सादिक यांनी दिली़ दरम्यान, शहरात जवळपास ८५० मजुरांच्या सहायाने स्वच्छता केली जाते़ महापालिकेने २५ सायकल रिक्षा नव्याने खरेदी केल्या असून आणखी आॅटो भाड्याने घेतले जाणार आहेत़ त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़