शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! किरकोळ कारणावरून मध्यरात्री तरुणाचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:16 IST

crime news पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देपिया मार्केट समोर तीन तरुंसोबत झाली बाचाबाची

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील पिया मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 

समीर खान सिकंदर खान (२७, रा. असेफिया कॉलनी), असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, असेफिया कॉलनी येथील समीरचा गांजा विकण्याचा पिढीजात धंदा आहे. गुरुवारी मध्यरात्री समीर आपला मित्र आदिलसोबत पिया मार्केट येथील ओम साई लीला या बीअर बारमधून पार्सल आणण्यासाठी गेला होता. पार्सल घेऊन परत निघत असताना बारसमोरील वडाच्या झाडाजवळ त्याची तीन तरुणांसोबत किरकोळ बाचाबाची झाली. समीरचा मित्र यावेळी मदतीला धावून आला. त्याने दोघांना मारहाण केली. एका तरुणाने समीरच्या मांडीत धारदार शस्त्राने घाव केले. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. गुप्तांगाजवळ खोलपर्यंत जखम झाल्याने समीर कोसळला. प्रचंड रक्तस्राव सुरू होता. मोमीन खान आमीर खान, समीर खान बाबर खान या दोघांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी समीरला तपासून मृत घोषित केले. समीरचा खून झाल्याची वार्ता मध्यरात्री शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याची संपूर्ण यंत्रणा दाखल झाली. रात्री उशिरा सिटीचौक पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.

‘ते’ तीन आरोपी कोण?समीरची हत्या करणारे तीन आरोपी कोण, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. भांडण जेव्हा झाले तेव्हा त्याच्यासोबत असलेला आदिल याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. समीरच्या वसाहतीत तणावपूर्ण शांतता होती. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल होत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संशयित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद