अजिंठ्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:40 IST2020-11-13T12:38:00+5:302020-11-13T12:40:31+5:30
मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आले नाही.

अजिंठ्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
अजिंठा: अजिंठ्याजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या गोलटेक जवळील एका शेतात 40 वर्षीय इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. शुक्रवारी सकाळी येथील नागरिकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक गिरीधर ठाकूर, कर्मचारी अक्रम पठाण आदींनी पाहणी केली. शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. डोक्याशेजारी एक मोठा दगड आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती मिळेल अशी माहिती माहिती सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी दिली.