शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

जायकवाडीच्या जलाशयात १५ फुट लांबीची महाकाय मगर आढळ्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 7:29 PM

Jayakwadi Dam News धरणात पोहण्यासाठी कुणी उतरू नये असे आवाहन जायकवाडी प्रशासनाने केले आहे.  

ठळक मुद्देनाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतासन २००६ ला गोदावरीला महापूर आला होता या पुरात मगर धरणात आल्याचे बोलले जाते

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास १५ फुट लांबीची  महाकाय मगर  धरण नियंत्रण कक्षातील कर्मचारी व सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसांना आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दहा महिण्या पूर्वी डिसेंबर २०१९ ला जलाशयात मगरीचे दर्शन झाले होते. २००६ नंतर धरणात आतापर्यंत पाच वेळा  मगर प्रकट झाली आहे. दरम्यान धरणात पोहण्यासाठी कुणी उतरू नये असे आवाहन जायकवाडी प्रशासनाने केले आहे.  

जलाशयात धरण दरवाजा परिसरात महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांंची भितीने गाळन उडाली आहे.  वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा मगर प्रकट झाल्याने नाथसागर जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. जायकवाडी धरणावर सुरक्षा रक्षक रात्री गस्त घालत असताना शांत पाण्यात  आवाज झाल्याने धरणावरील सुरक्षा रक्षक विजय वाघमारे यांनी आवाजाच्या दिशेने बँटरी फिरवली असता महाकाय मगर पाण्यात त्यांना दिसून आली. तातडीने त्यांनी धरणावरील कर्मचारी व पोलीसांना तेथे बोलावले, बराच वेळ तेथे जलाशयात मगर  होती. त्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने धरण नियंत्रण कक्षाच्या पाठिमागे कर्मचाऱ्यांना मगर दिसून आली. जायकवाडी धरणाच्या जलाशयात १५ फुट लांबीची मगर आढळून आल्याने पाणीपुरवठा पंप हाऊस कर्मचाऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलाशयाच्या काठावर विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे पंप हाऊस असून या कर्मचाऱ्यांना वारंवार जलाशयाकडे जावे लागते. मगर प्रकट झाल्याने कर्मचारी धास्तावले आहे.

सन २००६ ला गोदावरीला महापूर आला होता या पुरात मगर धरणात आल्याचे बोलले जात असून याच वर्षी  मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात मगरीचे पिल्ले अडकले होते या नंतर बरेच वर्ष नाथसागरात मगरीचे दर्शन झाले नाही मात्र, सन २०१५ ला परभणी जिल्हात सापडलेली मगर वनखात्याने जायकवाडी धरणात आणून सोडली होती. वनखात्याच्या या कृतीस जायकवाडी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शविला होता. २०१५ नंतर मात्र  सन २०१७ ला ८ नोहेंंबर  रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महाकाय मगर धरण परिसरातील पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती. पैठण येथील दिलीप सोनटक्के, जालिंदर आडसूळ, राजू गायकवाड, साहेबा ढवळे आतिष गायकवाड आशिष मापारी या तरूणांनी मोठे धाडस करीत या मगरीस जेरबंद करून वन खात्याच्या हवाली केले होते.  वनखात्याने  दोन दिवसानंतर मगरीस नागपूर येथील पेंच अभयारण्यात  हलविले होते. या नंतर २०१७,  २०१८, २०१९ व यंदा जलाशयात मगर  प्रकट झाली. 

नाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतासाधारणपणे गोड्या पाण्यातील मगर नोहेंबर महिण्यात जलाशया बाहेर येऊन अंडे देते. एका वेळी  २० ते २५ अंडे मगर देते. नोहेबर २०१७ ला जायकवाडी धरणाच्या मत्सबीज केंद्राच्या निर्जन भागातून  मगर बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आली होती. या मुळे या मगरीने या भागात अंडे दिले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या शिवाय २००६ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्या महापुरात अनेक मगरी जायकवाडी धरणात पुरासोबत आल्या असेही काही जणांचे म्हणने आहे. या मुळे नाथसागरात अनेक मगरी असल्याचे बोलले जात आहे.

मगरीने कुणावर हल्ला केला नाही......नाथसागरात अनेक मगर आढळून आल्या परंतू या मगरीने आतापर्यंत कुणावरही हल्ला केलेला नाही. मगरीस माणसाची चाहूल लागताच ती दूर निघून जाते असे मच्छीमारांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी