शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन’चे शानदार उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 01:30 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे आयोजित तीनदिवसीय ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन - २०१६’चे शनिवारी शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.

औरंगाबाद : ‘लोकमत’तर्फे आयोजित तीनदिवसीय ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन - २०१६’चे शनिवारी शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रांतील नामवंत संस्था या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लोकमत लॉन, लोकमत भवन येथे आयोजित ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन २०१६’चे उद््घाटन युनिव्हर्सल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्वेता वकील, जनरल मॅनेजर राजेश मोहिले, इरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सतीश गोरे, रेखा गोरे, डिस्कव्हरी स्कूलचे संचालक अमोल कंचार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. परीक्षा संपत नाही तोच विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांचे वेध लागतात. या कालावधीत काहीतरी नवीन शिकण्याची ओढ मुलांना असते. त्यासाठी पालकही शोध घेत असतात. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदींमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण देणाऱ्या संस्थांचा शोध घेतला जातो. विद्यार्थी, पालकांची होणारी धावपळ लक्षात घेऊन ‘लोकमत’ने विविध संस्थांना ‘समर कॅम्प एक्स्पो’च्या रूपाने एकत्र आणले आहे. सुटीचे नियोजन कसे करावे, उत्कृष्ट शाळा कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यातून मिळत आहेत.पालकांना ‘मिशन अ‍ॅडमिशन’द्वारे विविध शाळांची माहिती, तेथील शिक्षण पद्धती, सोयी-सुविधा आदी माहिती मिळत आहे. आपल्या पाल्याच्या विकासासाठी पालकांना अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी माहीत होण्यास हातभारच लागत आहे. युनिव्हर्सल हायस्कूल प्रस्तुत ‘समर कॅम्प एक्स्पो व मिशन अ‍ॅडमिशन- २०१६’, पॉवर्ड बाय इरा इंटरनॅशनल स्कूल व सहप्रायोजक डिस्कव्हरी स्कूल हे आहेत. १८ एप्रिलपर्यंत दुपारी ४ ते ८ या वेळेत होणाऱ्या या कॅम्पमध्ये मोफत प्रवेश आहे. अ‍ॅकॉर्ड कॅम्प्युटरचे रोहित मारिया, स्टाईलो फर्निचरचे संतोष शर्मा, पॉवर सोल्युशनचे झिरपे आणि डीकॅथलॉनचे शुभम दातखोरे यांच्या हस्ते लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या वार्षिक लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. विजेत्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत.