पीटलाइन अपुरी असल्याचा फटका; छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वेचा मार्ग अवघड

By संतोष हिरेमठ | Updated: May 6, 2025 11:44 IST2025-05-06T11:43:47+5:302025-05-06T11:44:13+5:30

पीटलाइन झाली तरी तिचा उपयोग कसा करणार? असा सवाल रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

Even if there is a peat line, it will not be beneficial; The route of the new railway from Chhatrapati Sambhajinagar is difficult | पीटलाइन अपुरी असल्याचा फटका; छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वेचा मार्ग अवघड

पीटलाइन अपुरी असल्याचा फटका; छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वेचा मार्ग अवघड

छत्रपती संभाजीनगर : पीटलाइन झाल्यानंतर नवीन रेल्वे सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, पीटलाइन ही १६ बोगींची झाली आहे. ती अपुरी असल्याचा आता ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग अवघड झाला आहे.

गेली अनेक वर्षे पीटलाइन नसल्याचे कारण पुढे करून नव्या रेल्वे सुरू करण्यास ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला होता. कशीबशी पीटलाइन झाली तरी तिचा उपयोग कसा करणार? असा सवाल रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे १६ बोगींची पीटलाइन किमान १८ बोगींची करावी लागणार आहे. परंतु, पीटलाइनच्या मार्गात अतिक्रमणांपासून अनेक अडचणी आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून नवीन रेल्वे नजीकच्या काळात सुरू होणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.

या रेल्वेंची आवश्यकता
- छत्रपती संभाजीनगर - मुंबई एक्स्प्रेस / वंदे भारत एक्स्प्रेस.
- छत्रपती संभाजीनगर -अकोला- नागपूर एक्स्प्रेस
- छत्रपती संभाजीनगर- बंगळुरू / म्हैसूर सुपर फास्ट एक्स्प्रेस
- नांदेड- छत्रपती संभाजीनगर-अहमदाबाद-जोधपूर एक्स्प्रेस
- छत्रपती संभाजीनगर- पनवेल- तिरूअनंतपुरम एक्स्प्रेस
- पूर्णा- पाटना एक्स्प्रेसचा विस्तार जालन्यापर्यंत

जालन्याला २६ बोगींची पीटलाइन, तिचा तरी वापर करा
जालन्याला २६ बोगींची पीटलाइन आहे. याठिकाणी आजघडीला बोगी खराब झाल्यानंतर दुरूस्तीचे काम होत आहे. त्याबरोबर नियमित रेल्वे गाड्या स्वच्छ केल्या जात आहेत. पूर्णा - पाटणा एक्स्प्रेस, जालना - छपरा रेल्वे, वंदे भारत एक्स्प्रेसची देखभाल केली जाते. या पीटलाइनचा वापर करून छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे सुरू करणे शक्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

अनास्थेमुळे नव्या रेल्वे मिळेनात
मोठे औद्योगिक आणि पर्यटन केंद्र असूनही केवळ रेल्वे विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे छत्रपती संभाजीनगरला नवीन गाड्या मिळत नाहीत. पीटलाइन होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत काही महत्त्वाच्या गाड्या संभाजीनगरहून ‘टीओटी’ तत्त्वावर किंवा जालन्याची पीटलाइन वापरून सोडता येतील. तसेच काही गाड्या जालना अथवा नांदेडहून संभाजीनगरमार्गेही सोडता येतील.
- स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

जुलैपर्यंत काम पूर्ण
आगामी जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरील पीटलाइनचे काम पूर्ण होईल. पीटलाइनच्या विस्तारीकरणासंदर्भातही निर्णय होईल.
- प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) ‘दमरे’

Web Title: Even if there is a peat line, it will not be beneficial; The route of the new railway from Chhatrapati Sambhajinagar is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.