शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही निवडणूक काळात दारूविक्री घटली

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : नुकताच संपलेल्या लोकशाहीच्या सोहळ्यात गावोगाव दारूचा महापूर वाहिल्याचे ऐकिवात असताना आकड्याकडे पाहिल्यानंतर उलट स्थिती दिसून येते.

हिंगोली : नुकताच संपलेल्या लोकशाहीच्या सोहळ्यात गावोगाव दारूचा महापूर वाहिल्याचे ऐकिवात असताना आकड्याकडे पाहिल्यानंतर उलट स्थिती दिसून येते. प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्यात देशी मद्याची विक्रीतर साडेपाच टक्क्यांनी घसरली असताना विदेशी व बिअरची स्थिती यापेक्षा निराळी नाही. वाईनला कोणी वाली नसल्याचे आकडे सांगतात; परंतु वास्तव चित्र वेगळेच होते, हेही तेवढेच खरे. निवडणुकीत फुकट मिळत असल्यामुळे कधीही न पिणारे झुलतात. तळीरामांच्या खिशातच बाटल्या असतात. गावागावात दारूची पोहोचती केल्या जात असल्याचे चित्र प्रत्येक निवडणुकीत पाहवयास मिळते. ग्रामीण भागापेक्षा शहरातील सुशिक्षित वर्गाची पसंत निराळी असते. निवडणुकीत देशीऐवजी विदेशी मद्याला पसंती मिळाल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला उलट अनुभव आला. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दारूविक्री घटली. मागील मे, जून, जुलैै आणि आॅगस्टपेक्षाही आकडे घसरले. आॅक्टोबरमध्ये देशी मद्याची विक्री दुपटीने घसरली. परिणामी, ५.५९ टक्क्यांनी आकडे घटले. विदेशी मद्याचीही हीच गत झाली. आॅगस्टमधील १७.९० वरून सप्टेंबरमध्ये १५.४२ टक्क्यांवर आली. आॅक्टोबर महिन्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही. दोन्हीपेक्षा बिअरला साफ नकारल्याचे दिसून येते. आॅगस्टमध्ये बिअरची २४.६५ टक्के विक्री होती. ती सप्टेंबरमध्ये ७.५१ तर आॅक्टोबरमध्ये ५.३३ टक्के घसरली. वाईनला जिल्ह्यात कोणी वाली राहिले नाही. सगळ्या मद्यापेक्षा बरी असल्याचा शिक्का असलेल्या वाईनला कोणी तोंड लावले नाही. त्यामुळे जुलैत ११.६२ टक्के वाईनची विक्री झाल्यानंतर सातत्याने आकडे घसरले. सप्टेबरमध्ये उणे १.८८ टक्के वाईनची विक्री झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी दारूविक्री चांगली होती. तद्नंतर निवडणुकीच्या दोन्ही महिन्यात दारूविक्रेत्यांना नुकसान सोसावे लागल्याचे आकडे सांगतात. निवडणुकीत अधिक मद्य विक्रीचा अंदाज खोटा ठरला आहे. (प्रतिनिधी)