शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

इतिवृत्त पडून तरी सभांवर सभा सुरू

By admin | Updated: October 13, 2016 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसचिव विभाग या विलंबाला अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत असले तरी खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.नियमानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्याच्या २० तारखेपूर्वी घेण्यात येते. प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. नगरसेवकही आपापल्या वॉर्डातील विकासासाठी अशासकीय ठराव ठेवून मंजूर करून घेतात. चालू महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत यावे, असे अनिवार्य असते. नव्हे सभेच्या विषयपत्रिकेवरील पहिला विषय हा मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी हाच असतो. इतिवृत्ताला मंजुरी देऊनच नवीन विषयावर चर्चा होते. इतिवृत्ताला मंजुरी दिल्याशिवाय त्या कामकाजाला कायदेशीर रूप प्राप्त होत नाही. परंतु महापालिकेत या नियमाला फाटा देण्याचे काम अलीकडे सुरू झाले आहे. मार्च २०१६ पासून अनेक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त मंजुरीविना पडून आहेत. काही सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त तयार करण्यात आले असले तरी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेले नाही. इतिवृत्त मंजुरीसाठी न आणण्याचे कारण काय, अशी चर्चा आता मनपा वर्तुळात सुरू आहे. पदाधिकाऱ्यांनीच हे इतिवृत्त मंजुरीविना दडवून ठेवल्याचेही बोलल्या जात आहे. महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यापूर्वी या इतिवृत्तांमध्ये काही ठराव घुसडण्याची शक्यता राजकीय मंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे.आज मनपाची सर्वसाधारण सभागुरुवारी (दि. १३) मनपाची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत प्रशासनातर्फे मालमत्ता कराच्या नियमावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मनपाने तयार केलेल्या नवीन नियमावलीवर सभेत गरमागरम चर्चा अपेक्षित आहे. नगरसेवकांकडूनही अनेक अशासकीय प्रस्ताव सभेत मांडण्यात आले आहेत.सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तयार करण्याचे काम नगरसचिव विभागाकडून होते. नगरसचिव विभाग हा प्रशासनाचा एक भाग आहे. त्यांच्याकडे इतिवृत्त तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव आहे. काही सभांचे इतिवृत्त रखडले आहेत. जे तयार असतील ते सुद्धा लवकरच मंजूर करून सदस्यांच्या हाती देण्यात येतील. इतिवृत्त पेंडिंग ठेवण्याचा काहीच विषय नाही.त्र्यंबक तुपे, महापौरमहापालिका अधिनियमाच्या नियम क्रमांक ५ मधील प्रकरण २ मध्ये सभा कामकाज नियमावलीवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त शक्यतो पुढील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत असावे, असे अपेक्षित आहे. नियमावलीत ‘शक्यतो’ या शब्दाचा सोयीस्कर अर्थ काढून औरंगाबाद महापालिकेने अनेक सभांचे इतिवृत्त दडवून ठेवले आहे. सहा ते आठ महिन्यांपूर्वीच्या सभांमध्ये कोणते ठराव मंजूर झाले हे असंख्य नगरसेवकांच्याही लक्षात असण्याचे कारण नाही. प्रत्येक सभेचे इतिवृत्तही अनेकजण वाचत नाहीत. याचाच फायदा घेऊन राजकीय मंडळी मंजूर न झालेले विषय सोयीस्करपणे टाकू शकतात.सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेवकांकडून ऐनवेळीचा प्रस्ताव अजिबात घेता येत नाही. महापालिका सभा कामकाज नियमावलीच्या अनुसूची ड मधील प्रकरण २ मध्ये ऐनवेळीचा प्रस्ताव घेऊ नये असे म्हटले आहे.४स्थायी समिती आणि मनपा आयुक्तांकडून आलेला प्रस्ताव ऐनवेळी म्हणून घेता येऊ शकतो. पूर्वी मनपात या नियमांचे कोटेकोर पालन होत होते. ४आता सभा सुरू असतानाच ऐनवेळीचे विषय राजरोसपणे घेण्यात येतात आणि मंजूरही होतात.नगर सचिव विभागाकडे पूर्वी मनुष्यबळ नव्हते. आता काही कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रलंबित इतिवृत्त तयार करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांकडे हे इतिवृत्त मंजुरीसाठी पाठवूनही दिले आहेत. तीन ते चार सभांचे इतिवृत्त तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच हे कामही संपणार आहे.दिलीप सूर्यवंशी, नगर सचिव, मनपा