शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवी येथे बंजारा धर्मपीठाची स्थापना

By admin | Updated: March 14, 2016 00:39 IST

लातूर : बंजारा समाजाच्या धर्मपीठाची स्थापना वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला होणार आहे. रामनवमी दिवशी पोहरादेवी येथे बंजारा धर्मपरिषद भरणार असल्याची माहिती

लातूर : बंजारा समाजाच्या धर्मपीठाची स्थापना वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला होणार आहे. रामनवमी दिवशी पोहरादेवी येथे बंजारा धर्मपरिषद भरणार असल्याची माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे हिरालाल राठोड यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली. हिरालाल राठोड म्हणाले, बंजारा काशी पोहरादेवी, उमरी येथे भव्य भक्तीधाम उभारण्यात आले असून, तेथे सर्व देवतांचे मंदिर, संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा रामनवमी दिनी होणार आहे. यावेळी राष्ट्रसंत प.पू. रामराव बापू पिठाधीश्वर यांचे आशिर्वचन होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील बंजारा समाज बांधव या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी बंजारा साहित्य व सांस्कृतिक परिषद होणार असून, या सोहळ्याला बंजारा लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी, गीतकार, प्रबोधनकार यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यानिमित्त विजापूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, पुसद, पोहरादेवी येथे भव्य पालखी मिरवणूकही निघणार आहे. पोहरादेवी येथे प.पू. रामराव बापू स्वत: श्री हमुलाल महाराज यांच्या पालखीचे स्वागत करणार आहेत.भक्तीधामाच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत. साहित्य, धर्म परिषद आणि धर्मपीठाची स्थापना होणार असल्याने देशभरातील बंजारा समाज या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे हिरालाल राठोड यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अंकुश जाधव, सुरेश चव्हाण, गणपत राठोड, प्रा.प्रभू आडे, उषा आडे, बाबूराव जाधव, विश्वनाथ राठोड, अमृतराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.