वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्साहात

By Admin | Updated: May 8, 2014 23:47 IST2014-05-08T23:46:53+5:302014-05-08T23:47:22+5:30

औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून गुरुवारी एमएच-सीईटी-२०१४ ही सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा औरंगाबाद विभागात घेण्यात आली.

Entrance to the Medical Entrance Examination | वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्साहात

वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्साहात

औरंगाबाद : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून गुरुवारी एमएच-सीईटी-२०१४ ही सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा औरंगाबाद विभागात घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १५ हजार ७९२ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेला ३९० विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. मिर्झा सिराज बेग यांनी सांगितले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, अशा अभ्यासक्रमांसाठी राज्यातील १२४ महाविद्यालयांमध्ये ५ हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ८ मे रोजी सकाळी १० ते १ या वेळेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षा शांततेत पार पडावी, यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार, घाटीचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. बेग यांनी सांगितले. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी ५५० अधिकारी, कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मेडिकल सीईटीसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रात गेले आणि पालक केंद्राबाहेर बसून होते. विभागातील विद्यार्थी जिल्हा हजर गैरहजर औरंगाबाद ६९९४ १४९ जालना १८९८ ४९ बीड ५७३० १३९ उस्मानाबाद१५६० ५३

Web Title: Entrance to the Medical Entrance Examination