जालना : अंबड रोडवरील नूतन वसाहत भागातील मुख्य रस्त्यावर झालेली अतिक्रमणे शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी हटविली. सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांचे पथक याठिकाणी दाखल झाले व त्यांनी येथील अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे काही जणांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून हटविल्याने हा रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}