प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 03:14 PM2021-11-16T15:14:46+5:302021-11-16T15:16:27+5:30

शासकीय रजा, सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळी केलेल्या कामाचा माेबदला म्हणून दरवर्षी एक महिन्याचा पगार प्राेत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावा

Encouragement! Pay 1 month extra salary to Police in the state; Recommendation of the Director General to the Home Secretary | प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस

प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस

googlenewsNext

- राजेश निस्ताने

नांदेड : महाराष्ट्र राज्य पाेलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना शासकीय रजा, सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळी केलेल्या कामाचा माेबदला म्हणून दरवर्षी एक महिन्याचा पगार प्राेत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावा, अशी शिफारस राज्याचे पाेलीस महासंचालक संजय पांडे यांनी १० नाेव्हेंबर राेजी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे केली आहे. ही शिफारस मान्य झाल्यास राज्यातील १ लाख ८४ हजार ९४४ पाेलीस अधिकारी व अंमलदारांना याचा लाभ मिळणार आहे. या प्राेत्साहन भत्त्यापाेटी वार्षिक ८५१ काेटी ३७ लाख ५३ हजार ४७२ रूपये एवढा खर्च येणार आहे. हा खर्च पाेलीस दलाच्या विविध लेखा शिर्षाखाली मंजूर अनुदानातून भागविला जाणार आहे.

सध्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ड्युटी करणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन दिले जाते. मात्र त्याची एका वर्षात केवळ आठ दिवसांची मर्यादा आहे. ती वाढवून ३० दिवस करण्याची मागणी अप्पर पाेलीस महासंचालक (एसआरपीएफ) यांनी ४ जून २०१९ ला केली. मात्र हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा ५८ दिवस अधिक काम, सण-उत्सवातही रस्त्यांवर राहणाऱ्या आणि जीव धाेक्यात घालून नाेकरी करणाऱ्या पाेलिसांसाठी एवढ्या वर्षात पाहिल्यांदाच महासंचालक संजय पांडे यांनी दिलासादायक मागणी केली आहे. शासन त्याला मंजुरी देते का, याकडे राज्यातील सुमारे २ लाख पाेलीस अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

नऊ राज्यात आधीच अंमलबजावणी
नऊ राज्यांमध्ये आधीपासूनच अतिरिक्त वेतनाची अंमलबजावणी केली जाते. पंजाबमध्ये प्राेत्साहन भत्ता, ओरिसा राज्यात २० हजारांपर्यंत भत्ता दिला जाताे. मध्यप्रदेशात एक महिन्याचे वेतन व १५ दिवस अतिरिक्त रजा, बिहारमध्ये एक महिन्याचे वेतन व २० दिवस अतिरिक्त रजा, उत्तराखंडमध्ये एक महिन्याचे वेतन व ३० दिवस अतिरिक्त रजा दिली जाते. तर, दिल्ली, उत्तरप्रदेश, मिझाेराम, हरियाणा या राज्यात एक महिन्याचा पगार दिला जाताे. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मागणी करण्यात आली आहे.

सर्वाधिक निधी शिपाई-हवालदारांना लागणार
पदनाम             संख्याबळ             एकूण खर्च
निरीक्षक             २,८०६             २९ काेटी ८८ लाख
सहाय्यक निरीक्षक ३,८४९             ३० काेटी ७ लाख
उपनिरीक्षक ८,९५२             ५० काेटी ९९ लाख
सहा. उपनिरीक्षक १४,९५४             १०६ काेटी ९० लाख
हवालदार            ३५,८२५             २१० काेटी ७० लाख
नाईक             ३६,८३४             १६० काेटी ७७ लाख
शिपाई             ८१,७२४             २६२ काेटी ३ लाख
एकूण             १,८४,९४४             ८५१ काेटी ३७ लाख


सुट्ट्यांचा तुलनात्मक तक्ता
सुट्ट्यांचा तपशील शासकीय कर्मचारी             पाेलीस
शासकीय सुट्ट्या             १०४ दिवस                         ०० दिवस
साप्ताहिक रजा             ०० शून्य                         ५२ दिवस
सार्वजनिक सुट्ट्या २५ दिवस                         ०० दिवस
अतिरिक्त रजा             ०० दिवस                         १५ दिवस
किरकाेळ रजा            ०८ दिवस                         १२ दिवस
एकूण सुट्ट्या             १३७ दिवस                         ७९ दिवस

Web Title: Encouragement! Pay 1 month extra salary to Police in the state; Recommendation of the Director General to the Home Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.