शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याचे कर्मचारी संपावर

By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST

परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्‍यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे.

परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्‍यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे. पाणी पुरवठा विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ कायम कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी १०० टक्के या संपात सहभागी झाले आहेत. मराठवाडा न. प. व मनपा कामगार कर्मचारी युनियनने संपासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने चर्चेमध्ये केवळ कोरड्या आश्वासनांशिवाय कोणताही प्रश्न सोडविला नाही. कामगार, कर्मचार्‍यांना सहा-सहा महिने वेतन दिले जात नाही मात्र काही विशिष्ट कर्मचार्‍यांना मात्र मागील दरवाजाने लाखो रुपये अदा करुन विशेष लाभ दिले आहेत. ठराविक कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. जवळपास ३० कर्मचार्‍यांना हा विशेष लाभ देण्यात आला आहे. परंतु ५ हजार रुपये दरमाह वेतन घेणार्‍या रोजंदारी कामगारांचे वेतन ७ महिन्यांपासून थकले आहे. किमान वेतनाचा शासन निर्णयही अंमलात आणला जात नाही. सात महिन्यांपासून पगार झाला नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पगाराअभावी दररोजचा दिवस कसा काढावा, असा मोठा निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन सुरू करण्यात आले. आयटक प्रणित मनपा कामगार- कर्मचारी युनियनचे कॉ. राजन क्षीरसागर, पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष शेख आयुब, प्रकाश जाधव, मनोहर गवारे, गणेश गायकवाड, काशिनाथ वाघमारे, अविनाश पाठक, चंद्रकांत मोरे आदी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)टंचाईच्या काळात जनतेच्या रोषाला कनिष्ठ कर्मचार्‍यांनाच तोंड द्यावे लागते. मात्र प्रशासनाने कालबद्ध पदोन्नती, किमान वेतन, पगारी सुट्या, रजा आदी कर्मचार्‍यांच्या सुमारे २९ मागण्या सोडविण्याचा प्रयत्न देखील केला नाही. वेळोवेळी केलेल्या संपात मंजूर मागण्यांची फाईल पुढचा संप करेपर्यंत उघडायचीच नाही, या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांची तड लावल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार कामगारांनी केला आहे.