कर्मचाऱ्यांनो ! तीन ते पाच आॅफिसमध्येच बसा...

By Admin | Updated: January 28, 2015 00:57 IST2015-01-28T00:43:15+5:302015-01-28T00:57:26+5:30

सोमनाथ खताळ , बीड आपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात

Employees! Sit in three to five offices ... | कर्मचाऱ्यांनो ! तीन ते पाच आॅफिसमध्येच बसा...

कर्मचाऱ्यांनो ! तीन ते पाच आॅफिसमध्येच बसा...


सोमनाथ खताळ , बीड
आपल्या भागात आलेल्या अडीअडचणींची तक्रार करण्यासाठी पालिकेत गेल्यावर तक्रार ऐकण्यासाठी कोणीच हजर नसते, तसेच कर्मचारी कार्यालयात बसण्याऐवजी इतरत्र टवाळक्या मारत फिरायचे, मात्र आता याला आळा बसणार आहे. दुपारी तीन ते पाच यावेळेत जर कर्मचाऱ्यांनी आॅफिस सोडले तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून पालीकेतील दांडीबहाद्दर व कामात हालगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी म्हणून भालसिंग यांनी सूत्रे स्वीकारली आणि पालिकेत शिस्त काय असते याचा नमूना कर्मचाऱ्यांना पहावयास मिळाला. यापूर्वी कर्मचाऱ्यांवर वरीष्ठांचा वचक नसल्याने कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवायचे. मात्र आता भालसिंग यांनी दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना चांगलाच दम दिला आहे.
पालीकेच्या कामात गतिमानता यावी, शहरातील नागरीकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांचा निपटारा व्हावा, या उद्देशाने मुख्याधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत पलाीकेतील कर्मचाऱ्यांनी दुपारच्यावेळेस आॅफिस सोडायचे नाही, असे सक्त आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला तसे पत्रही पाठविले आहे. पत्र पाठवून त्यांची रिसिव्हड कॉपी घेतल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे पी.ए.पाटील यांनी सांगितले.
आठवड्याचा अहवाल सोमवारी लेखी स्वरूपात द्या
आठवड्यात किती नागरीकांच्या तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल प्रत्येक सोमवारी कार्यालयास सादर करावा. तसेच नागरीकांच्या तक्रारी परस्पर वरीष्ठांकडे जातील, याची दक्षता घ्यावी, असे प्रत्येक विभागाला पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
यांना पाठविले पत्र
नगररचनाकार, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभाग प्रमुख, मलेरीया पर्यवेक्षक, सार्वजनीक बांधकाम, विद्युत अभियंता,कर अधिकारी यांना हे पत्र पाठविले असून असून मंगळवारी प्रत्येकाला हे पत्र मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Employees! Sit in three to five offices ...