शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर जिल्हा मागणीस जोर

By admin | Updated: August 22, 2014 00:59 IST

उदगीर : उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीस आता पुन्हा जोर चढला आहे़ यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीसोबतच युवा समितीनेही मुख्यमंत्र्यांना नव्याने साकडे लागले आहे़

उदगीर : उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीस आता पुन्हा जोर चढला आहे़ यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीसोबतच युवा समितीनेही मुख्यमंत्र्यांना नव्याने साकडे लागले आहे़ उदगीर जिल्हा करावा, अशी मागणी साधारणत: गेल्या ५८ वर्षांपासून सुरु आहे़ उदगीर हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमेवर वसलेले असून सध्याचा विस्तार पाहता हे ठिकाण जिल्हा करणे अत्यावश्यक असल्याचे कृती समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ उदगीर, देवणी व जळकोट या तालुक्यांना लातूर प्रशासकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरते़ तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलूरचीही अशीच अवस्था आहे़ त्यामुळे या पाच तालुक्यांसह अहमदपूर, चाकूर व शिरुर अनंतपाळ तालुका उदगीरशी जोडून जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे़ याशिवाय, बजारपेठ, उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत़ आरोग्याच्या सुविधा देणारे शासकीय व खाजगी मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत़ कृषी बाजारपेठेचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे़ कडधान्ये व तेलबिया व्यापाराकरिता उदगीर राज्यात प्रसिद्ध आहे़ शहर ब्रॉडगेजने जोडले आहे़ प्रशासकीय कार्यालयांकरिता जागा उपलब्ध आहे़ त्यामुळे १९५६ पासून असलेली उदगीरकरांची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी उदगीर जिल निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर भोसले, निमंत्रक सुरेश पाटील नेत्रगावकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे़(वार्ताहर)उदगीर जिल्हा निर्मितीसाठी कृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे़ या लढ्याला आता युवा कृती समितीचे बळ लाभले आहे़ उदगीर जिल्हा निर्मिती युवा कृती समिती स्थापन करुन अध्यक्ष विजय निटुरे यांच्यासह समन्वयक अजित बेळकोणे, पप्पु वडगावे, राम मोतीपवळे, अहमद सरवर, आशिष अंबरखाने युवकांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्हा निर्मितीसाठी साकडे घातले आहे़