शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागातील ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

नांदेड :महावितरणच्या नांदेड शहर विभागात थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून ४ आॅगस्टपासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नांदेड :महावितरणच्या नांदेड शहर विभागात थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून ४ आॅगस्टपासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७४७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकावरही कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत १८१ वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.नांदेड शहरात ग्राहकांकडे वाढलेली थकबाकी कमी करुन वीज हानी कमी करण्यासाठी मुख्य अभियंता आर. जी. शेख आणि अधीक्षक अभियंता डी. डी. हामंद यांच्या सुचनेनुसार शहरी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एच. अग्रवाल यांनी ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत २२ पथके कार्यान्वित असून एका पथकात शहर विभागाचा एक सहायक अभियंता आणि इतर विभागातील एक सहायक अभियंता यांच्यासह चार जनमित्रांचा समावेश आहे.नांदेड शहर विभागात ४ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या ग्राहकांची संख्या १० हजार ३३७ इतकी असून त्यांच्याकडे १०.७६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ४ आॅगस्टपासून २२ पथकांनी ६२५ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. त्यांच्याकडे ७८.५७ लाखांची थकबाकी आहे. १२२ ग्राहकांचा वीजपुरवठा कायम स्वरुपात खंडित करण्यात आला असून त्यांच्याकडे १९.७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेच्या काळात थकबाकीदार ग्राहकांच्या दारात वीजपुरवठा खंडित करण्यास गेले असता १८८० ग्राहकांनी १ कोटी २ लाख रुपयांचा भरणा करुन वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळली. ही मोहीम पुढील काळातही चालूच राहणार असून ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे भरुन महावितरणला सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)