शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विजेचे तीन महिन्यांनी पुन्हा खाजगीकरण?

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार

औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याच्या उद्देशाने महावितरणने वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली. शहरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देऊन छळणाऱ्या जीटीएलने आपला गाशा गुंडाळला. जीटीएलमध्ये पूर्वी काम करीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांकडे मोठी थकबाकी दर्शविण्यात येत असली तरी ती कंपनी जाताना मोठ्या फायद्यातच राहिली आहे. जीटीएलने मागील तीन- चार महिन्यांपासूच गाशा गुंडाळण्याची तयारी केली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना जास्तीची बिले धाडल्याच्या तक्रारी आहेत. या बिलांबाबतच्या तक्रारी जीटीएलने घेतल्या. मात्र, त्यांचे निराकरण केले नाही. सदोष मीटर, जास्तीची बिले लावणे, बिलाबाबतीतले वाद न सोडविणे, असे प्रकार जाता जाता जीटीएलने केले आहेत. यामुळे अनेक नागरिकांनी वीज बिले भरलेले नाही. शहरातील नागरिकांकडे जीटीएलची वीज बिलांची सुमारे १५० कोटी रुपये थकबाकी असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा आकडा १३४ कोटी रुपयांचा आहे, असे महावितरणमधील कर्मचारी सांगतात. एवढी मोठी असणारी ही थकबाकी तीन महिन्यांच्या आत वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे. सदोष मीटर किंवा अव्वाच्या सव्वा वीज बिलाची वसुली महावितरणचे कर्मचारी करू पाहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आगामी तीन महिन्यांच्या काळात जीटीएलच्या जागी दुसरी खाजगी कंपनी येणार असल्याचे महावितरणचे कर्मचारीच ठामपणे सांगतात. त्या कंपनीच्या अटीनुसार नागरिकांकडे असणारी बिले पूर्णपणे वसूल होणे आवश्यक आहे. ‘शून्य थकबाकी’ या अटीवरच नवीन कोणतीही कंपनी येणार असून त्यादृष्टीने ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याची जबाबदारी महावितरणने उचलली आहे. यामुळे नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याची तयारी महावितरणने केली आहे. ४काही नागरिकांकडे एकापेक्षा जास्त मीटर आहेत. यापैकी काही मीटरचे रीडिंग अधिक येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतची तक्रार करणारी निवेदनेही नागरिकांनी जीटीएलला दिलेली आहेत. ४मात्र, आता पुन्हा आलेले महावितरण सदोष मीटर असणाऱ्या ग्राहकांकडूनही जीटीएलने लावलेली रक्कम वसूल करू पाहत आहे, त्यामुळे महावितरणविरुद्धही नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ४सुमारे दीडशे कोटींची ही थकबाकी अर्थातच फुगलेला आकडा असल्याचे आता महावितरणचे कर्मचारी मान्य करीत आहेत. जीटीएलने अधिक फायद्यासाठी अव्वाच्या सव्वा बिले लावल्याची नागरिकांची तक्रार आहे. ४अर्थात, वीज बिलाच्या वसुलीचे अवघड काम महावितरणने करायचे आणि पुन्हा तीन महिन्यांनंतर खाजगी कंपनीने ताबा घ्यायचा यामुळेही महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. वीज बिल वसुलीवर ‘इन्सेन्टिव्ह’ (विशेष भत्ता) मिळावा, असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे. नागरिकांकडील थकबाकीपैकी सुमारे ३० ते ४० टक्के वीज बिल अधिकचे लावलेले असल्याच्या तक्रारी आहेत.