शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्याबरोबर आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचा निर्देशांक ०.७५ आहे, तर जिल्ह्याचा ०.७२ आहे. पुढच्यावर्षी ...

औरंगाबाद : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्याचा निर्देशांक ०.७५ आहे, तर जिल्ह्याचा ०.७२ आहे. पुढच्यावर्षी निर्देशांक राज्याबरोबर येईल, या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी डीपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालकमंत्री देसाई म्हणाले, मुलींचा जन्मदर प्रतिहजारी ९२३ आहे. तो वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जिल्ह्यात ३१ बालविवाह झाले. आगामी काळात बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न असतील.

जिल्हा वार्षिक योजनेत २६५ कोटींसाठी मंजुरी देण्यात आली. वाढीव प्रस्ताव ३६० कोटींचा केला आहे. आगामी वर्षांत जास्तीचे ९४ कोटी रुपयांची वाढीव मागणी केली आहे. आदिवासी क्षेत्राबाहेरील काही उपाययोजना असतात. त्यासाठी चार कोटी ६५ लाखांची मागणी केली आहे. विशेष घटक योजनेत अतिरिक्त १६ कोटींची मागणी केली आहे.

आजच्या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा आराखडा चर्चेला आला. ५५ लीटर प्रतिमाणसे पाणी देण्याची ती योजना आहे. ७०६ कोटी त्यासाठी मंजूर करीत डोंगरी भागाला तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, ९० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. ५७ कोटी खर्च झाले आहेत. पोलीस फोर्स मॉडर्न करण्यात येणार आहे. ३० टक्के मान्यता झाली असून, आठ ते दहा दिवसांत पूर्ण मंजुरी देण्यात येतील. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, आ. उदयसिंग राजपूत, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची उपस्थिती होती.

जलजीवन मिशन ही केंद्राची योजना

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, जलजीवन मिशन केंद्र शासनाचा उपक्रम आहे. यामध्ये ८०० ग्रामपंचायती, ६९९ वसाहती आणि १२९९ गावे जिल्ह्यात आहेत. त्याचा ७०६ कोटींचा आराखडा केला आहे. स्रोतामध्ये काही बदल करावा लागणार आहे काय, उद‌्भव कुठे आहे, याचा विचार योजनेत करण्यात आला आहे. राज्य पातळीवर बैठक झाली. त्यात ही प्रादेशिक योजना समोर आली आहे. काही गावांना पाण्याचा स्रोत नाही. त्यांना दुरून पाणी आणावे लागणार आहे. पालकमंत्र्यांसमोर याबाबत आराखडा सादर केला आहे. जी गावे पाण्यापासून वंचित आहेत, ती समाविष्ट होणार आहेत.