शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांना घेतले फैलावर !

By admin | Updated: November 10, 2014 23:58 IST

बीड : अतिरिक्त शिक्षकाला संस्थेने रुजू करुन न घेतल्याने शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी येथील चंपावती माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

बीड : अतिरिक्त शिक्षकाला संस्थेने रुजू करुन न घेतल्याने शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी येथील चंपावती माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ६५ जणांचे तीन महिन्यांचे वेतन रोखले़ त्यामुळे ‘चंपावती’च्या शिक्षकांनी सोमवारी जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याकडे धाव घेतली़ पंडित यांनी शिक्षणाधिकारी लता सानप यांना धारेवर धरत तात्काळ वेतन द्या, असे आदेश दिले़ शिक्षकांना नाहक वेठीस धराल तर ते कदापि सहन करुन घेणार नाही, असा दमही त्यांनी भरला़अतिरिक्त ठरलेले शिक्षक सचिन खाडे यांना येथील चंपावती शाळेत रुजू करुन घ्यावे, असे आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी चार महिन्यांपूर्वी काढले होते़ मात्र, चंपावती संस्था खाडे यांना रुजू करुन घ्यायला तयार नव्हती़ त्यामुळे सप्टेंबर २०१४ मध्ये दस्तूरखुद्द शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय शिंदे यांनी चंपावती शाळेत जाऊन स्वत:च शिक्षक खाडे यांना रुजू करुन घेण्याची प्रक्रिया सुरु केली़ यावेळी संस्था पदाधिकाऱ्यांकडून धनंजय शिंदे यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता़ हे प्रकरण चांगलेच गाजले होते़ त्यानंतर शिक्षणाधिकारी सानप यांनी संस्थेचा राग शिक्षकांवर काढत ४९ शिक्षक, १६ कर्मचारी अशा ६५ जणांचे सप्टेंबर २०१४ पासूनचे वेतन रोखले़ त्यामुळे शिक्षकांना ऐन दसरा, दिवाळीत उधारी, उसणवारी करावी लागली़ सोमवारपासून शाळा सुरु झाल्या़ त्यामुळे उपमुख्याध्यापक बी़ एऩ गिरी यांच्या नेतृत्वाखाली डी़ टी़ नागरे, जे़ बी़ कुलकर्णी, आऱ एम़ देशपांडे, संजय चौसाळकर, प्रकाश मानूरकर, राजेंद्र देवकर, सुरेखा कुलकर्णी, सुलभा केंडे, नयना कुलकर्णी आदींनी जि़प़ अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची भेट घेतली़ शिक्षणाधिकारी सानप या आधीच बैठकीच्या निमित्ताने तेथे आलेल्या होत्या़शिक्षकांनी कैफियत मांडल्यावर अध्यक्ष पंडित यांनी शिक्षणाधिकारी सानप यांना ‘तुम्ही कुठल्या नियमात शिक्षकांचे वेतन रोखले?’ असा सवाल केला़ ‘तुम्ही द्वेषातून वेतने रोखले आहे़ संस्थाचालक, मुख्याध्यापक सहकार्य करत नसतील तर कारवाई त्यांच्यावर करा;पण शिक्षकांचे वेतन रोखू नका, अशी तंबी पंडित यांनी दिली़ आजच्या आज वेतन द्या, असे फर्मान त्यांनी सोडले़ सानप यांची भंबेरी!अध्यक्ष पंडित यांनी शिक्षकांसमोरच शिक्षणाधिकारी सानप यांची खरडपट्टी काढली़ खुलासा करताना सानप यांची भंबेरी उडाली़ संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक सारे एकच आहेत़ संस्था सहकार्य करीत नाही, त्यामुळे शिक्षकांचे वेतन रोखले तर संस्था ताळ्यावर येईल म्हणून वेतन रोखल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे त्यांचे हसू झाले़ ‘आम्ही शाळेत गेल्यावर तीन तास कोणी फिरकले नाही़ त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याशी असे वागणे योग्य आहे का?’ असा प्रतिसवाल त्यांनी केला़ (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे प्राथमिक शिक्षण चंपावती विद्यालयात झालेले आहे़ याच शाळेतील शिक्षक थकित वेतनाचे गाऱ्हाणे घेऊन अध्यक्ष पंडित यांच्याकडे आले़ ‘खरे तर मीच संपर्क करायला हवा होता़़़’ असे म्हणत त्यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले़ त्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला़ यावेळी शिक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतूक केले़ शिष्यच गुरुंसाठी धावून आला़़़ अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या़