शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

दसरा महोत्सवास यंदा रंग चढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:29 IST

१६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झालेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा गर्दी ओसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : १६३ वर्षाची परंपरा असलेला व सर्वांचे आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवात यावर्षी पहिल्यांदाच उद्घाटनाला विलंब झाला आहे. घटस्थापना होऊन पाचवा दिवस उलटले तरीही बैठकावर बैठकाच घेतल्या जात आहेत. झोक्यांसह इतर मनोरंजनाच्या बाबींची जुळवाजुळव रविवारी सुद्धा झालेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा गर्दी ओसरली आहे.म्हैसूरनंतर हिंगोली येथील दसरा दुसºया क्रमांकाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास दीडशे वर्षांची या महोत्सवाची परंपरा असलेल्या महोत्सवावर पहिल्यांदाच दिरंगाई येऊन ठेपली आहे. एकीकडे मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाºया आकर्षक दसरा महोत्सवातील साहित्याची जोडाजोड सुरु असताना मात्र तालुका स्तरावर दसरा सुरु होऊन पाचवा दिवस उजाडला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी दसरा पाहण्यास येणारी मंडळी तालुक्याच्या ठिकाणीच रमत आहे. विशेष म्हणजे अजूनही दसरा महोत्सवातील प्रदर्शन व सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे झोकेच सुरु झालेले नाहीत. मात्र समितीकडून बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत. त्यात समितीचे प्रमुख असलेले अधिकारी बैठकांना येतही नाहीत. ज्यांनी दसºयाची परंपरा चालण्यासाठी कारभाराची धुरा आतापर्यंत खांद्यावर वाहिली त्यांना तेथे साधी किंमतही मिळत नसल्याने पाठ फिरविली आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच नियोजनावर पाणी फेरले गेले. उरले सुरले काम पावसाने आटोपले. त्यामुळे यंदाचा महोत्सव पुढील पाच दिवसांततरी पूर्ववत होईल की नाही, अशी चिंता आहे. कारण सध्या दांडियामुळे शहरवासिय या प्रदर्शनात येत नसल्याचे चित्र आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना अजून दसºयात ती रंगतच दिसत नसल्याने त्यांनीही पाठ फिरविली.